Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेत गणरायाची प्रतिष्ठापना !  सदस्य - पदाधिकाऱ्यांचा पुढाकार, आरतीला मंत्र्यांची उपस्थिती ! !आनंदराव पाटील- चुयेकरांच्या समाधीला माजी संचालकांचे अभिवादनगोकुळच्या जागा वाटपावरुन महायुतीत वादाचे फटाके! मंत्री मुश्रीफ हे भाजपची ताकत गौण असल्याचा संदेश देत आहेत का? खासदार महाडिकांचा सवालडॉ. शिवशंकर मारजक्के यांचा अॅवार्ड ऑफ एक्सलन्सने सन्मानशिक्षकांचा सन्मान की निवडणुकीचा शो ?जनसुराज्य शक्तीचे नवे पदाधिकारी, युवक जिल्हाध्यक्षपदी अक्षय जरग ! शहराध्यक्षपदी शेखर जाधव, माजी नगरसेवक आर.डी.पाटील जनसुराज्यमध्ये ! !अचानक शाळा भेटी ! पायाभूत सुविधा, गुणवत्तेची तपासणी ! !कौस्तुभ गावडेंची भूमिका शिक्षकहिताची, त्यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री, पार्लमेंटरी बोर्डाकडे आग्रह धरणार - खासदार धनंजय महाडिकडी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये युवावर्स उत्साहातउजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या कारभारात अनियमितता, करवीर पंचायत समितीसमोर उपोषणाचा इशारा- राजीव माने

जाहिरात

 

संस्थेच्या नावांनी बनावट नियुक्ती आदेश, चार शिक्षिकांसह लिपिकाविरोधात पोलिसात गुन्हा

schedule08 Jul 26 person by visibility 364 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिक्षकांच्या वेतनासाठीची आवश्यक शालार्थ आयडीसाठी बनावट नियुक्तीपत्रे देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शाहूपुरी  पोलिस स्टेशनमध्ये,  लिपिक उमेश कल्लाप्पा शिंगे वडणगे, शिक्षिका प्रमिला नामदेव चव्हाण सासवड, उज्ज्वला महादेव चांदगुडे सासवड, प्रियांका शंकर पाटील सासवड आणि सरवतजहान तौफिक बागवाण सासवड या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी  लिपिक उमेश शिंगेना अटक केली आहे. सरकारची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सहसचिवांनी या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

 यासंदर्भात पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की, ११ जुलै २०२३ ते ३० जून २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. विवेकानंद शिक्षण संस्थेचे पुरंदर हायस्कूल  व ज्युनिअर कॉलेज येथे. पुरंदर येथील या ज्युनिअर कॉलेजमध्ये तासिका तत्वावर काम करणाऱ्या  शिक्षकांना आयडी कार्ड काढण्यासाठी नियुक्तीपत्रे देऊ असे सांगितले होते. त्यांनी वरिष्ठांच्या परस्पर व  प्राचार्यांना खोटे सांगून संस्थेचे बनावट नियुकती आदेश बनविले. ११ जुलै २०२३ रोजी संस्थेचे लेटरहेड, शिक्के वापरुन शिक्षिका प्रमिला नामदेव चव्हाण सासवड, उज्ज्वला महादेव चांदगुडे सासवड, प्रियांका शंकर पाटील सासवड आणि सरवतजहान तौफिक बागवाण सासवड यांना नियुक्तीपत्रे बनवून दिली.  खोटे जावक क्रमांकाचा उल्लेख करत संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाचा बनावठ ठराव तयार केला. लिपिक शिंगेनी तयार केलेली बनावट नियुक्तीपत्रे, ठराव शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे येथे सादर केली. तसेच संस्थेचे ठराव दाखवत शालार्थ आयडी बनवून घेतले. हा प्रकार समोर आल्यानंतर संस्थेच्यावतीने लिपिकासह चार शिक्षिकांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल  झाला.  पोलिसांनी, या प्रकरणी लिपिक शिंगेना अटक केली आहे. पोलिसांनी शिंगेना कोर्टात हजर केले असता तीन दिवसाची कोठडी सुनावली आहे.विवेकानंद शिक्षण संस्थेनेही शिंगेना सेवेतून निलंबित केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes