Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मी मंडळे तोडणारा नव्हे तर जोडणारा कार्यकर्ता –आमदार राजेश क्षीरसागरपाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेची धडक मोहीम; महिन्यात ५३ लाखाची वसुली ! ६५ नळ कनेक्शन बंद; ६ अनधिकृत कनेक्शनला ब्रेक !!आयएसटीई नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषद सदस्यपदी डॉ.महादेव नरके गोकुळच्या राजकारणात शिवसेना ‘मधला भाऊ’! करवीरमध्ये विश्वास पाटील व आमच्याकडे ७७५ ठराव! !सेवा संकल्प अंतर्गत अधिकाऱ्यांचा स्वच्छता अभियानात सहभागपरदेशातील विद्यार्थिनी अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी वारणा विद्यापीठातशिवसेनेकडून अजित नरके, अजित पाटील, एस.आर. पाटील, विरेंद्र मंडलीक, अशोक फराकटे, बाजीराव पाटलांचे अर्ज२२ कोटीचा प्रोजेक्ट कर्जाच्या माध्यमातून उभारणार, जिपच्या स्थायी समितीत ठरावकाँग्रेसकडून बाबासो चौगुले, अभिजीत तायशेटे, प्रकाश पाटील, रामराज कुपेकर, सचिन घोरपडे, राहूल देसाई, अंजना रेडेकरांचे अर्जराष्ट्रवादीकडून गोकुळसाठी राजेश पाटील, अरुण डोंगळे, रणजितसिंह पाटील, प्रा. किसन चौगले, वसंतराव धुरे, सतीश पाटलांचे अर्ज

जाहिरात

 

पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेची धडक मोहीम; महिन्यात ५३ लाखाची वसुली ! ६५ नळ कनेक्शन बंद; ६ अनधिकृत कनेक्शनला ब्रेक !!

schedule18 Sep 26 person by visibility 16 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभाग वसुली पथक  तसेच अनधिकृत नळ कनेक्शनवर कारवाई करण्यासाठी आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांच्या सूचनेनुसार चार उपद्रव शोध पथके स्थापन करण्यात आली आहेत. थकीत पाणीपट्टी वसुली तसेच अनधिकृत नळ कनेक्शनवर कारवाई होत आहे. १८ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर २०२६ या एक महिन्याच्या कालावधीत महापालिकेच्या या पथकांमार्फत एकूण ५३ लाख ८२ हजार ८१८ रुपयांची पाणीपट्टी वसुली झाली. या कालावधीत थकीत पाणीपट्टी असलेल्या ६५ नळ कनेक्शनचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. तसेच शहरातील ६ अनधिकृत नळ कनेक्शनवरही कारवाई करण्यात आली आहे.
महापालिकेने पाणीपट्टी वसुलीसाठी चार स्वतंत्र वसुली पथके कार्यरत असून या पथकांकडून थकीत पाणीपट्टीधारकांशी संपर्क साधून थकीत रक्कम भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. संबंधितांनी थकबाकी न भरल्यास नियमानुसार नळ कनेक्शन बंद करण्याची कारवाई करण्यात येत आहे. महापालिकेच्यावतीने अनधिकृत नळ कनेक्शनधारकांना १२ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आपले कनेक्शन अधिकृत करून घेण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे. या एक महिन्याच्या कालावधीत कनेक्शन अधिकृत करून न घेतल्यास संबंधितांवर महासभा ठरावानुसार २५ हजार रुपये दंड तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
तरी शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी आपल्या नळ कनेक्शनची पाणीपट्टी नियमितपणे भरावी. तसेच अनधिकृत नळ कनेक्शन घेऊ नये अथवा अनधिकृत जोडणी आढळल्यास ती तत्काळ नियमित करून घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.ही कारवाई अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर उपायुक्त नागेंद्र मुतकेकर, परितोष कंकाळ जल अभियंता हर्षजीत घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपद्रव शोध पथक व पाणीपट्टी वसुली विभागाने केले आहे

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes