Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मी मंडळे तोडणारा नव्हे तर जोडणारा कार्यकर्ता –आमदार राजेश क्षीरसागरपाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेची धडक मोहीम; महिन्यात ५३ लाखाची वसुली ! ६५ नळ कनेक्शन बंद; ६ अनधिकृत कनेक्शनला ब्रेक !!आयएसटीई नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषद सदस्यपदी डॉ.महादेव नरके गोकुळच्या राजकारणात शिवसेना ‘मधला भाऊ’! करवीरमध्ये विश्वास पाटील व आमच्याकडे ७७५ ठराव! !सेवा संकल्प अंतर्गत अधिकाऱ्यांचा स्वच्छता अभियानात सहभागपरदेशातील विद्यार्थिनी अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी वारणा विद्यापीठातशिवसेनेकडून अजित नरके, अजित पाटील, एस.आर. पाटील, विरेंद्र मंडलीक, अशोक फराकटे, बाजीराव पाटलांचे अर्ज२२ कोटीचा प्रोजेक्ट कर्जाच्या माध्यमातून उभारणार, जिपच्या स्थायी समितीत ठरावकाँग्रेसकडून बाबासो चौगुले, अभिजीत तायशेटे, प्रकाश पाटील, रामराज कुपेकर, सचिन घोरपडे, राहूल देसाई, अंजना रेडेकरांचे अर्जराष्ट्रवादीकडून गोकुळसाठी राजेश पाटील, अरुण डोंगळे, रणजितसिंह पाटील, प्रा. किसन चौगले, वसंतराव धुरे, सतीश पाटलांचे अर्ज

जाहिरात

 

मी मंडळे तोडणारा नव्हे तर जोडणारा कार्यकर्ता –आमदार राजेश क्षीरसागर

schedule18 Sep 26 person by visibility 15 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: ‘व्हिनस कॉर्नर मित्र मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये मोठी एकी आहे. हे मंडळ कधीही फुटणार नाही याची मला खात्री आहे. मी असेन किंवा खासदार धनंजय महाडिक असोतआम्ही माणसं घडविणारी माणसं आहोत. मंडळे तोडायची नाही  तर मंडळे जोडायची, या भावनेने काम करणारा मी कार्यकर्ता आहे.’असे उद्गार आमदार राजेश क्षीरसागर यांनी काढले. येथील व्हिनस कॉर्नर मित्र मंडळातर्फे आयोजित गणेशोत्सव देखावा उद्घाटन कार्यक्रम शुक्रवारी झाला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात आमदार क्षीरसागर बोलत होते. खासदार धनंजय महाडिक, मंडळाचे अध्यक्ष शशिकांत बीडकर व अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. आमदार क्षीरसागर म्हणाले, ‘व्हिनस कॉर्नर मित्र मंडळाचे यंदाचे पन्नासावे वर्ष आहे. मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये मोठी एकी आहे. हे मंडळ कधीही फुटणार नाही. मंडळाचे अध्यक्ष शशिकांत बीडकर यांच्याकडे मी प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी, त्यांच्याकडे पाहतो. नियोजनबद्ध काम करणारा हा कार्यकर्ता आहे. माणूस म्हटला की मतभेद असू शकतात. पण सारे जण एकत्र काम करत आहेत.‘

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes