Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पाणीपट्टी दरवाढीला महापालिकेच्या सभेत मंजुरी, दरवाढीतून मिळालेल्या रकमेचा विनियोग पाणी पुरवठा योजनेसाठीचजिल्हाधिकारी, सीईओंच्या उपस्थितीत जल जीवन मिशन, घनकचरा - सांडपाणी व्यवस्थापनची आढावा बेठकमहापालिकेच्या शाळेतील फलकावर शिक्षकांच्या जातीचा उल्लेख ! नगरसेवकांनी उघडकीस आणला प्रकार !!उद्योगविश्वाच्या बदलत्या गरजा ओळखा; टीसीएस उपाध्यक्षांचा टीकेआयईटी विद्यार्थ्यांना मंत्रमहापालिका शाळांच्या सेवा - सुविधेकडे नेहा तेंडुलकरने वेधले सभागृहाचे लक्षडॉ. प्रभाकर कोरे यांना घाळी समाजभूषण पुरस्कार, २४ ऑगस्टला वितरणकोल्हापूर प्रेस फोटोग्राफर क्लबचे पुरस्कार जाहीर !  अनिल वेल्हाळ, संजीव भोर यांना पुरस्कार ! !ताराबाई पार्कातील गोकुळ शॉपीला नवा लूक, दुधासह दुग्धजन्य पदार्थ उपलब्धहॉस्पिटल चालविण्याचा परवाना नाही, मात्र चक्क सहा वर्षे प्रॅक्टिस ! एक हॉस्पिटल सील, एका डॉक्टरांना आर्थिक दंड ! !प्रत्येक नागरिकाने कायद्याबाबत सजग असावे -: पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड

जाहिरात

 

रविकिरण इंगवलेंचे आमदारपुत्रावर आरोप, ऋतुराज क्षीरसागरांचाही पलटवार

schedule04 Jun 26 person by visibility 248 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव व नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांच्यावर आरोप केले. इंगवले यांनी पत्रकार परिषद घेत,  ऋतुराज क्षीरसागर हे कॅसिनोमध्ये जाऊन जुगार खेळत असल्याचा व्हिडिओ दाखविला. लोकप्रतिनिधी जर जुगार खेळत असतील तर नवीन पिढीचे भवितव्य काय ? असा सवाल करत इंगवले यांनी क्षीरसागर पिता पुत्रावर टिकास्त्र सोडले. टक्केवारीच्या माध्यमातून मिळवलेल्या पैशाच्या बळावर आमदारपुत्र पैसे उधळत असल्याचा आरोप इंगवले यांनी केला. पंधरा ते वीस दिवसापूर्वीचा हा व्हिडिओ असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान इंगवले यांनी केलेल्या टीकेवर नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी पलटवार केला आहे. नगरसेवक क्षीरसागर म्हणाले, ‘इंगवले यांनी वैयक्तिक आरोपांची मर्यादा ओलांडली. त्यांनी, विधानसभा निवडणुकीपूर्वी क्षीरसागर कुटुंबींयावर बेछूट केले आरोप केले. आमदार राजेश क्षीरसागर यांना बदनाम करण्याचा प्रकार केला. महापालिका निवडणुकीत आमच्याविरोधात पत्रकबाजी केली. ऑडिओ क्लिप फिरवले. आताच्या त्यांच्यापत्रकार परिषदेला मी फार महत्व देत नाही. बदनामीच्या षडयंत्राला भीक घालत नाही. जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. त्यांच्या आरोपावर कायदेशीर कारवाई करता येईल यासंबंधी कायदेशीर सल्ला घेत आहे. त्यानंतर पुढची दिशा ठरवेन.’

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes