+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustअजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची यादी, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटलांचा समावेश adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश adjust कोल्हापुरात काँग्रेसचा सरप्राइज चेहरा कोण ? आज उत्तर मिळणार ! adjust शिवसेनेकडून आमदार प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरकेंना उमेदवारी adjustदक्षिणमध्ये पाटील, महाडिकांनी घेतले अर्ज ! उत्तरसाठी अर्ज घेणाऱ्यांत व्ही.बी, सत्यजित कदम यांची नावे !! adjustदूध उत्पादकांसाठी खुशखबर, गोकुळतर्फे नवीन ४००० बायोगॅस मंजूर ! चेअरमन अरुण डोंगळे adjustप्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांंना ३५ हजार रुपयांचा दंड, ३०० किलो प्लॅस्टिक जप्त adjustराहुल आवाडे गुरुवारी अर्ज भरणार adjust कोल्हापुरात बाइकस्वारांची धूम
1001157259
1001130166
1000995296
schedule11 Oct 24 person by visibility 96 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शारदीय  नवरात्र महोत्सवाच्या अष्टमीला अर्थात शुक्रवारी करवीर निवासिनी अंबाबाई देवीची महिषासूरमर्दिनी रुपात पूजा बांधली. देवीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी होती. मंदिर परिसर भाविकांनी फुलला.  
जगदंबेने अष्टादशभूजा म्हणजे अठरा हातांचे विराट रूप धारण करून महिषासुराचा वध केला होता. त्याची स्मृती म्हणून दरवर्षी नवरात्र महाष्टमीला करवीर निवासिनी अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रुपात पूजा बांधली जाते. आज या पूजेत जगदंबे थोडसं वेगळं रूप साकारण्यात आला आहे महिषोत्तमांग संस्थिता म्हणजे महिषासुराचे उत्तम अंग अर्थात त्याचे मस्तक त्याच्यावर विराजमान असं हे जगदंबेच महिषासुराच्या मस्तकावर पाय रोवून उभी राहिलेली सर्व देव वरदायिनी अशी जगदंबा साकारली आहे. करवीर शक्तिपीठ देवता म्हणून महिष मर्दिनी या देवतेचा उल्लेख येतो ५१ शक्तिपीठाच्या यादीत कोल्हापूरला सतीचे त्रिनेत्र पडले व तिथे महिषमर्दिनी नावाने देवी आणि क्रोधीश भैरव नावाने भैरव विराजमान असल्याचे सांगितले जाते. करवीरची शक्तीपीठ देवता अर्थात अंबाबाई मंदिरातील महाकाली जी चतुर्भुजा महिषासुरमर्दिनी रुपात विराजमान आहे तिच्यासमोर  रात्री महाष्टमी होम केला जाईल.