सतेज पाटलांचा तरुणाईशी संवाद, कोल्हापूरच्या विकासासंबंधी चर्चा
schedule09 Jan 26 person by visibility 41 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी, (९ जानेवारी २०२६) तरुणाईशी संवाद साधला. याप्रसंगी पाटील यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील ठळक बाबी, आयटीपार्कसंबंधी धोरण, शिक्षण, शाळा व खेळाला प्रोत्साहन अशा विविध विषयाच्या अनुषंगाने चर्चा केली. हॉटेस सयाजी येथे हा कार्यक्रम झाला. ‘GenZ’ या नावांनी युवक-युवतींशी संवाद साधणारा हा कार्यक्रम वेगळेपण दर्शविणारा होता. याप्रसंगी आमदार पाटील यांनी, ‘युवक, युवतींच्या सहभागातून कोल्हापूर घडणार’असे स्पष्ट केले. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनीही याप्रसंगी संवाद साधला. या कार्यक्रमात आमदार पाटील यांनी कोल्हापूरच्या विकासासंबंधी तरुणाईच्या अपेक्षा जाणून घेतल्या. कोल्हापूरच्या विकासाचे धोरण ठरविताना युवक, युवतींच्या मतांना खूप महत्व असल्याचे नमूद केले. याप्रसंगी चर्चेत सहभागी होताना युवकांनी, ‘स्टार्टअप्स, आयटीपार्क, रोजगार निर्मिती, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा यासंबंधी मते व्यक्त केली.