अरुण डोंगळेशी खटके, ए वाय पाटलांनी घेतली विनय कोरेंची भेट
schedule24 Sep 26 person by visibility 122 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन : उमेदवारी अर्ज दाखल आणि छाननी प्रक्रिया पार पडल्यानंतर गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी हालचाली गतिमान होत आहेत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ए वाय पाटील यांनी बुधवारी 23 सप्टेंबर रोजी जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते व संस्थापक आमदार विनय कोरे यांची भेट घेतली. विनय कोरे हे महायुतीमधील वजनदार नेते आहेत. ए वाय पाटील यांचा महायुतीमार्फत निवडणूक लढविण्याचा इरादा हे गेले काही दिवस त्या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान ए वाय पाटील यांना महायुतीमध्ये घेण्यासाठी गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे यांचा विरोध आहे. राधानगरी तालुक्यातील राजकीय वर्चस्ववरून डोंगळे व पाटील यांच्यामध्ये संघर्ष आहे. डोंगळे यांनी काही दिवसापूर्वी दूध उत्पादकांच्या मेळाव्यात बोलताना महायुतीमध्ये ए वाय पाटील यांच्या प्रवेशाला विरोध केला होता. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दारात या दोन नेत्यांची भेट झाली होती. त्यावेळी ही डोंगळे व पाटील यांच्यामध्ये खटके उडाले होते. दरम्यान ए वाय पाटील यांनी बुधवारी वारणानगर येथे जाऊन आमदार कोरे यांची भेट घेतली. महायुतीमध्ये कोरे यांच्या शब्दाला वजन आहे. या भेटीतला तपशील समजू शकला नाही मात्र गोकुळ निवडणुकीच्या अनुषंगाने त्या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे वृत्त आहे. कोरे यांच्या माध्यमातून ए वाय पाटील आता महायुतीसाठी प्रयत्नशील आहेत.