महावीर कॉलेजमध्ये २८ सप्टेंबरपासून रानभाज्या-वनचारा प्रदर्शन
schedule26 Sep 24 person by visibility 412 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय दुधाळ जनावर संवर्धन वर्ष म्हणून २०२४ हे वर्ष साजरे करण्यात येत आहे. यानिमित्ताने येथील महावीर कॉलेजमध्ये २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत रानभाज्य-वनचारा प्रदर्शन होत आहे. अशी माहिती कॉलेजचे प्राचार्य आर. व्ही. लोखंडे व बी व्होक विभागाचे समन्वयक डॉ. रवींद्र मिरजकर यांनी दिली.
हे प्रदर्शन सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत खुले असेल. कॉलेजच्या आचार्य विद्यानंद सांस्कृतिक भवन येथे प्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी भारतीय चारा संशोधन केंद्राचे माजी तांत्रिक अधिकारी कृष्णाजी कोकाटे, संस्थेचे अध्यक्ष अॅड. के. ए कापसे, संचालिका डॉ. सुषमा रोटे, निसर्गमित्र परिवाराचे कार्यवाह अनिल चौगुले, स्नेहलता कापसे यांची प्रमुख उपस्थिती असेल. पत्रकार परिषदेवेळी डॉ. संदीप नलवडे, प्रा. नम्रता शिंगे, प्रा. श्रृती गिजवणेकर, प्रा. प्रतिराज मोरे उस्थित होते.