+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustअजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची यादी, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटलांचा समावेश adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश adjust कोल्हापुरात काँग्रेसचा सरप्राइज चेहरा कोण ? आज उत्तर मिळणार ! adjust शिवसेनेकडून आमदार प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरकेंना उमेदवारी adjustदक्षिणमध्ये पाटील, महाडिकांनी घेतले अर्ज ! उत्तरसाठी अर्ज घेणाऱ्यांत व्ही.बी, सत्यजित कदम यांची नावे !! adjustदूध उत्पादकांसाठी खुशखबर, गोकुळतर्फे नवीन ४००० बायोगॅस मंजूर ! चेअरमन अरुण डोंगळे adjustप्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांंना ३५ हजार रुपयांचा दंड, ३०० किलो प्लॅस्टिक जप्त adjustराहुल आवाडे गुरुवारी अर्ज भरणार adjust कोल्हापुरात बाइकस्वारांची धूम
1001157259
1001130166
1000995296
schedule03 Sep 24 person by visibility 260 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘समाजात बदल घडविण्याची दृष्टी प्रेेस फोटोग्राफरमध्ये असते. माणसांच्या भावना अचूकपणे कॅमेऱ्यात टिपण्याचे फोटोग्राफरचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. कोल्हापूरच्या प्रेस फोटोग्राफीला मोठा वसा आणि वारसा आहे.कोल्हापुरातील छायाचित्रकारांचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान व्हावा, इतकी ताकत येथील प्रेस  फोटोग्राफीत आहे.’ असे उद्गगार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के यांनी काढले. 
 कोल्हापूर प्रेस फोटोग्राफर क्लबतर्फे पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी (तीन सप्टेंबर) आयोजित केला होता.यावेळी अभिनेता आनंद काळे, उद्‌‌‌योजक जयेश ओसवाल, छायाचित्रकार शशिकांत मोरे, दीपक जाधव यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.  शाहू स्मारक भवन येथे हा कार्यक्रम झाला.
  याप्रसंगी कुलगुरू शिर्के यांच्या हस्ते फोटोग्राफर जॉनी ट्रेनर वृत्त प्रक़ाशचित्र जीवनागौरव पुरस्कार छायाचित्रकार मालोजी केरकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. रोख आकरा हजार रुपये, मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते.रोहन साळोखे स्मृती लक्षवेधी पुरस्काराने पत्रकार सुनील सकटे आणि पत्रकार राहुल गडकर यांना सन्मानित केेले. मानचिन्ह, मानपत्र आणि रोख पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप  आहे.याप्रसंगी छायाचित्रकार संदीप मोरे यांच्या मातोश्री विमल मोरे, महापालिकेच्या अग्निशमन दलाचे अधिक़ारी मनिष रणभिसे आणि व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांचा कृतज्ञता सत्कार करण्यात आला. प्राचार्य जीवन साळोखे यांनी मनोगत व्यक्त केले. छायाचित्रकार आदित्य वेल्हाळ यांनी प्रास्ताविक केले.  पत्रकार समीर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.