Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेसाठी 241 उमेदवार! पंचायत समितीसाठी 455 जण रिंगणात !! आबिटकर नॉलेज सिटीमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहातबोगस डॉक्टरमुक्त गावे जाहीर करा; जिल्हाधिकाऱ्यांचा आरोग्य विभागाला डोसअमृता डोंगळे, संग्राम कलिकते, पुनम पाटील यांना विजयी करु या,  हसन मुश्रीफांची मतदारांना साद       काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी इंद्रजीत बोंद्रेगोकुळमध्ये   ७७ वा  प्रजासत्ताक दिन उत्साहात साजराकोल्हापूरचे सुपुत्र कर्नल विनोदकुमार पाटील यांना सैन्य दलाचे विशिष्ट सेवा मेडल भाजपच्या गटनेतेपदी मुरलीधर जाधवशिवसेनेच्या गटनेतेपदी शारंगधर देशमुखप्रजासत्ताक दिनी विविध क्षेत्रातील कर्तबगारांचा सत्कार

जाहिरात

 

शिवसेनेतर्फे शुक्रवारी इच्छुक उमेदवारांची प्रशिक्षण कार्यशाळा

schedule11 Dec 25 person by visibility 317 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यभरात शहर आणि गावपातळीवर धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष सुरु करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण कार्यशाळा आणि शिबिर होणार आहेत. यामध्ये आगामी महापालिका जिल्हा परिषद निवडणुका लढविण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी किंबहुना निवडणूक पूर्वीची रणनिती आखण्यासाठी इच्छुक उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. "मिशन कोल्हापूर महानगरपालिका" अंतर्गत शिवसेना इच्छुक उमेदवारांची  कार्यशाळा शुक्रवारी (१२ डिसेंबर २०२५ ) होत आहे. अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी  दिली आहे. दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथे सकाळी अकरा वाजता कार्यशाळेला प्रारंभ होईल. निवडणुकीपूर्वी प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेवून त्या मार्गी लावणे, मतदारापर्यंत पक्षाचे काम, सरकारी योजना पोहचवून जनसंपर्कातून वातावरण निर्मिती करण्यासाठी ही कार्यशाळा महत्वाची ठरणार आहे. याप्रसंगी शिवसेना पक्षाकडून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसह त्यांच्या प्रतिनिधीना निवडणूक लढविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, कायदे तज्ञांचे सल्ले, खर्च हिशोबाचे प्रशिक्षण आदी देण्यात येणार आहे. या कार्यशाळेस शिवसेना पक्षाचे निवडणूक राज्य समन्वयक वैभव वाघ आणि मयूर कदम प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. तरी या कार्यशाळेस शिवसेनेच्या सर्व इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes