पी. सावळाराम यांच्या भावगीतातील सौंदर्य जनसामान्यांना आपलेसे करणारे
schedule03 Jun 26 person by visibility 8 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर: पी. सावळाराम हे जनकवी होते. त्यांच्या भावगीतातील सौंदर्य जनसामान्यांना आपलेसे करणारे होते. श्रीकांत नरुलेजनकवी होते. त्यांच्या भावगीतातील सौंदर्य जनसामान्यांना आपलेसे करणारे होते. श्रीकांत नरुले यांच्या नव्या पुस्तकातून भावगीतांचे सौंदर्य उलगडून दाखवण्यात आले आहे, असे प्रतिपादन लेखक, पत्रकार श्रीराम पचिंद्रे यांनी केले.
चित्रपटकवी डॉ. श्रीकांत नरुले लिखित 'पी. सावळाराम यांच्या भावगीतातील सौंदर्य' ह्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. रणधीर शिंदे हे प्रमुख पाहुणे होते. उत्कर्ष प्रकाशनाचे सुधाकर जोशी यांनी सोहळ्याचे आयोजन केले होते.
सामान्य माणसाचे भावजीवन सावळारामांच्या भावगीतातून उत्कटपणे प्रकट झालेले आहे असे सांगून डॉ. शिंदे यांनी कविता आणि भावगीतातील भेद आणि सौंदर्यस्थळांविषयी विवेचन केले. डॉ. नरुले यांनी आपल्या मनोगतात पुस्तक निर्मितीच्या प्रक्रियेविषयीचे चिंतन व्यक्त केले. आपल्या काव्य निर्मितीला 'पुढारी'कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांनी उत्तेजन दिल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात डॉ. जी. पी. माळी, प्रा. बाबासाहेब पोवार, सुनील मुसळे, सुभाष माने, वीरेंद्र ऐदमाळे, स्नेहा वाबळे, रवींद्र चिवटे, चंद्रकांत देशमुख, सौ. चित्रादेवी देशमुख, बाळासाहेब भोसले, प्रमोद गिरी यांची भाषणे झाली. प्रसाद नरुले यांनी संयोजन केले. प्रा. दीपक जोशी यांनी सूत्रसंचालन केले.