Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महापालिकेला मिळणाऱ्या जीएसटी अनुदानात वाढ कराआयटी पार्कची जागा एमआयडीसीच्या ताब्यात, आमदार राजेश क्षीरसागरांचा पाठपुरावाचित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्राची संख्या वाढवावी - मेघराज राजेभोसलेकृष्णराज महाडिकांनी घेतली पोलिस महासंचालकांची भेट, महत्वपूर्ण विषयासंबंधी निवेदन सादरशिक्षक - कर्मचाऱ्यांना पूर्वीचीच वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना  चालू ठेवा सतेज पाटलांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न, आम्ही महायुती म्हणून गोकुळची निवडणूक लढविणार - हसन मुश्रीफशिवराज्याभिषेकदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम ! व्याख्यानमाला, मिरवणुकीचे आयोजन !!अण्णासाहेब पाटील महामंडळला हजार कोटींचा निधी द्या, अन्यथा हलगी बजाव आंदोलनलिंगायत माळी समाजातर्फे तेरा जूनला विद्यार्थी गुणगौरव, पुरस्कार वितरण समारंभ शिक्षकांच्या प्रश्नांची आठ दिवसात सोडवणूक करा, अन्यथा जिल्हा परिषदेसमोर साखळी उपोषण

जाहिरात

 

आयटी पार्कची जागा एमआयडीसीच्या ताब्यात, आमदार राजेश क्षीरसागरांचा पाठपुरावा

schedule27 May 26 person by visibility 64 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील शेंडापार्क परिसरात आयटी क्षेत्राचा विकास साधण्यासाठी ३४.३६ हेक्टर सरकारी जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यानुसार कोल्हापूर शहर परिसरातील ई वॉर्ड येथील मौजे कसबा करवीर येथील रि.स.नं.५८३, ५८७ व ५८८ मधील कृषी विभागाच्या ताब्यातील जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांना कब्जेहक्काने देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. 

आय.टी.पार्कचा विषय जागेच्या दरामुळे रखडला जावू नये. तसेच ही जागा कमीत कमी दरात उपलब्ध व्हावी, यासाठी आमदार राजेश क्षीरसागर प्रयत्नशील होते. परंतु, ३१ मार्च नंतर नवीन दराने जागेचे बाजारमूल्य सुमारे १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे त्यापूर्वीच जागा हस्तांतरणाचा विषय मार्गी लावण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर सातत्याने प्रयत्नशील होते. क्षीरसागर यांनी तात्काळ उद्योग मंत्री आणि सचिव, उद्योग विभाग यांच्याकडे पाठपुरावा करून   रक्कम तात्काळ भरण्याबाबत मंत्रालय स्तरावरून आदेशाची मागणी केली. त्यानंतर सरकारी यंत्रणा गतिमान होवून १ एप्रिलच्या पूर्व संध्येला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बाजारमुल्य तक्त्यातील दरानुसार  जमिनीचे एकत्रित मुल्यांकन पाच कोटी साठ लाख तेवीस हजार ९८० रुपये  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागाकडे जमा केले होते.

या क्षेत्राची प्रत्‍यक्ष मोजणी व सिमांकन करुन २७ मे २०२६ रोजी महसूल विभागाच्‍या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे व तहसिलदार स्‍वप्निल पवार, यांनी शेंडा पार्क येथील ३४.३६ हेक्टर क्षेत्राचा ताबा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी  उमेश देशमुख, कार्यकारी अभियंता  इराप्‍पा नाईक यांच्याकडे सुपूर्द केला. आता ही  जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात देण्यात आली असून, आय.टी. पार्क निर्मितीचा मार्ग आणखी सुकर झाला असल्याची माहिती आमदार  क्षीरसागर यांनी दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes