मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा ठरला ! मंगळवारी तपोवन मैदानात सभा !!
schedule11 Jun 23 person by visibility 630 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी (१३ जून २०२३) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तपोवन मैदान येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत आहे. मुख्यमंत्री शिंदे हे तपोवन मैदान येथील कार्यक्रमासाठी मंगळवारी दुपारी चार वाजता उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री सचिवालय कार्यालयाकडून यासंबंधी माहिती दिली आहे. प्रशासकीय पातळीवर शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे मुख्यमंत्र्यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी जातीनिशी लक्ष घालून यंत्रणा गतीमान केली आहे. क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांसमेवत तपोवन मैदान येथे होणाऱ्या कार्यक्रमाची पाहणी केली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला आहे. नोडल अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या दारी ही संकल्पना राबविली जात आहे. या संकल्पनेतंर्गत सरकारच्या विविध योजना थेट लाभार्थ्यांपर्यत पोहचविल्या जातात.