Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अखिल भारतीय किसान सभेचे २४ वे अधिवेशन कोल्हापुरात‘स्वमन सामाजिक’तर्फे कोल्हापुरात मानवाधिकारसंबंधी जनजागृतीप्रॅक्टिस फुटबॉल क्लबतर्फे बुधवारी आजी – माजी फुटबॉलपटूंचा सत्कारसतेज पाटलांचा प्रचाराचा धडाका, महायुतीचे नेते अडकले जागा वाटपाच्या चक्रात !!जिल्हाधिकाऱ्यांनी केली दुष्काळी जत तालुक्यातील गावांची पाहणीअभिनेते मोहन जोशी यांना यंदाचा ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’ जाहीरवन्यजीव सप्ताह निमित्त खडके अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून  सन्मानएसएनडीटी महिला विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी प्रा .विलास  नांदवडेकर  ग्रामीण भागांशी जोडलेलं, अनुभवी नेतृत्व ! रामचंद्र भोगमांची उमेदवारी दूध उत्पादकांना वाटतेय आपली !!मराठी अध्यापक संघातर्फे दोन दिवसीय शिक्षक साहित्य संमेलन

जाहिरात

 

अखिल भारतीय किसान सभेचे २४ वे अधिवेशन कोल्हापुरात

schedule02 Oct 26 person by visibility 9 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : अखिल भारतीय किसान सभेचे २४ वे  राज्य अधिवेशन कोल्हापुात सहा ते आठ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत होणार आहे. या अधिवेशनासाठी राज्यभरातील ४०० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती अधिवेशानचे निमंत्रक उदय नारकर व स्वागताध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. कसबा बावडा येथील श्रीराम सोसायटी सभागृह येथे हे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनास मार्गदर्शन करण्यासाठी किसान सभेचे  राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजित ढवळे राष्ट्रीय सरचिटणीस कॉम्रेड विजू कृष्णन, राज्याध्यक्ष उमेश देशमुख, आमदार विनोद निकोले, माजी आमदार जे. पी. गावीत, आणि किसान सभेचे राज्य चिटणीस डॉ. अजित नवले हे मार्गदर्शन करणार आहेत. मंगळवारी, सहा ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी अभिवादन करुन, प्रतिनिधी मिरवणुकीने श्रीराम सोसायटीकडे जातील. सकाळी अकरा वाजता ध्वजवंदन होऊन खुले सत्र होईल.अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. विजू कृष्णन करणार आहेत. पत्रकार परिषदेला राजेश वरक, चंद्रकांत कुरणे, राज साळोखे, लक्ष्मण पाच्छापुरे, विवेक गोडसे आदी उपस्थित होत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes