दाजीशी, माझं भांडण नाही, वांदे तर मंत्री मुश्रीफ- एवाय यांच्यामध्ये - के. पी. पाटील
schedule13 Feb 26 person by visibility 399 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " दाजी ए. वाय. पाटील आणि माझ्यामध्ये कसलेही भांडण नाही. मी आपला गरीब माणूस आहे. खरे वांदे तर मंत्री हसन मुश्रीफ आणि ए वाय पाटील यांच्यामध्ये आहे. राधानगरीतील जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयानंतर दाजींनी शड्डू मारला. तेव्हा मंत्री मुश्रीफ यांनीच काय ते वांदे मिटवावे. माझा काहीही संबंध नाही " अशी गुगली राधानगरी भुदरगडचे माजी आमदार के पी पाटील यांनी टाकली.
कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांचा कोल्हापुरात सत्कार आयोजित करण्यात आला होता ताराबाई पार्कमधील धैर्यप्रसाद हॉल येथे शुक्रवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बोलताना चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील यांनी राष्ट्रवादीला मिळालेल्या यशाचे श्रेय मंत्री मुश्रीफ यांना देताना निवडणुकीच्या कालावधीतील घडामोडींचा वापर केला. ते म्हणाले, " मंत्री मुश्रीफ यांनी चंदगड तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र केले. नंदिनी बाभुळकर व आमच्या गटाची एकत्रित बैठक घेतली. दोघे वेगळे लढला तर काय फटका बसू शकतो हे समजावून सांगितले. कार्यकर्त्यांचे नुकसान होते, पक्षाला फटका बसतो हे पटवून दिले. नंदिनी बाभुळकर व संग्राम कुपेकर यांच्यातील वाद मिटवला. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यामुळे चंदगड, आजरा, गडहिंग्लज या सगळ्या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला प्रचंड यश मिळाले. गडहिंग्लज तालुक्यात मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन प्रकाश चव्हाण व अमर चव्हाण यांच्यामध्ये एकोपा केला. आता मुश्रीफ यांनी राधानगरी भुदरगड तालुक्यात लक्ष घालून माजी आमदार के पी पाटील व ए वाय पाटील यांच्यामध्ये एकोपा घडून आणावा. " अशी विनंती केली.
माजी आमदार राजेश पाटील यांच्या या विधानाने व्यासपीठावरील मंत्री मुश्रीफ माजी आमदार के पी पाटील, नंदिनी बाभुळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ गोकुळचे जेष्ठ संचालक अरुण डोंगळे, मानसिंगराव गायकवाड, गोकुळचे माजी संचालक रामराजे कुपेकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैय्या माने, रणवीरसिंह गायकवाड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुरलेकर, धैर्यशील पाटील कौलवकर, शहराध्यक्ष आदिल फरास, अनिल साळोखे यांच्यासह उपस्थितामध्ये हसायची खसखस पिकली. तर सभागृहात उपस्थित कार्यकर्त्यांनी हसत हसत माजी आमदार राजेश पाटील यांच्या विधानाला सहमती दर्शवली. त्यानंतर भाषणाला उपस्थित राहिलेल्या माजी आमदार के पी पाटील यांनी, " मी आपला गरीब माणूस आहे. दाजी ए वाय पाटील यांच्याशी माझे कसलेही वांदे नाही. खरे वांदे तर मंत्री मुश्रीफ व ए वाय यांच्यामध्येच आहे. जिल्हा परिषदेतील निवडणुकीतील विजयानंतर ए.वाय यांनी शड्डूही ठोकला. आता मुश्रीफ यांनीच त्यांच्याशी असलेले वांदे मिटवावे. माझा काही वांदे नाही.' यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ यानी या विषयावर काही भाष्य केले नाही. मात्र जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जे यश मिळाले, ते सारे यश दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चरणी वाहत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनासाठी महायुतींच्या नेत्यांच्या सोबत बैठक होणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीच्या 20 जागा निवडून आल्यामुळे अध्यक्षपदासह आणखी एखादे पद मिळेल. जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करताना महायुती म्हणून भाजप शिवसेना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची शाहू आघाडी यांना सत्तेत सहभागी करून घेतले जाणार आहे. तसेच जनसुराज्य शक्ती पक्षालाही सत्तेत स्थान द्यावे लागणार आहे असे त्यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुरलेकर त्यांच्याकडे पहात सांगितले महापालिकेप्रमाणेच जिल्हा परिषदेमध्ये ही सव्वा वर्षाचा फॉर्मुला ठरविण्यात येणार आहे. पाच वर्षात राष्ट्रवादीकडून दोन पदार्थ मिळून आठ जणांना संधी देता येईल ज्यांना जिल्हा परिषदेमध्ये पदाची संधी मिळणार नाही. अशा सदस्यांना जिल्हा नियोजन समिती व अन्य ठिकाणी संधी दिली जाईल असे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.