Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
उद्योगपती आण्णासाहेब चकोते यांना पितृ‌शोककोल्हापुरातील इंडस्ट्रीजसाठी महिनाभरात उद्योगमंत्र्यांच्यासोबत बैठक – आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरसीएचबी प्राध्यापकांची मानधनवाढ, सेवास्थैर्य, अकरा महिन्याच्या नियुक्तीसाठी सरकारदरबारी पाठपुरावा करणारमहायुतीच्या सत्ताकाळात पेपर आहेत पण परीक्षा लिक, डिग्री आहेत पण नोकरी नाही, स्थिती बदलण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या - हर्षवर्धन सपकाळपहिल्या फेरीतच कौस्तुभ गावडे यांना विजयी करणार, कोल्हापुरातील मेळाव्यात निर्धारठरावधारकांच्या बैठकीत महायुतीमधील पदाधिकाऱ्यांत वादावादी, शपथ घेण्यावरुन  विषय चिघळलाशंकर खंडू पाटील जन्मशताब्दी सरकारतर्फे साजरी होणार, कोल्हापुरात १४ नोव्हेंबरला कार्यक्रमकोल्हापूरचा स्वाभिमान राखण्यासाठी समविचारी आघाडीला  विजयी करा - सतेज पाटीलसेवा संकल्प अभियानातून विद्या मंदिर, भेंडाई धनगरवाडा शाळेला नवे रूपकरवीर तालुका डाग पुसून काढणार, ठरावधारकांचा निर्धार ! महायुतीच्या नेतेमंडळीत आणाभाका ! !

जाहिरात

 

स्वप्नील कुसाळेच्या यशाचे युवासेनेकडून साखर -पेढे वाटून आनंदोत्सव

schedule01 Aug 24 person by visibility 829 categoryक्रीडा

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय नेमबाजपट्टू स्वप्नील सुरेश कुसाळे याने पॅरिस येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल मिळवून संपूर्ण देशाची मान उंचावली आहे. कोल्हापूरच्या सुपुत्राच्या या पराक्रमाबद्दल कोल्हापूर युवासेनेच्यावतीने पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शहरात साखर - पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गुरुवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे युवासेनेकडून फटाक्यांची आतषबाजी करून नागरिकांना साखर पेढे वाटप केले. यावेळी "भारत माता की जय", "वंदे मातरम्" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
  युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांनी, कोल्हापूर ही क्रीडा पंढरी असून, कोल्हापूरचे भाग्यविधाते राजर्षि शाहू महाराजांच्या राजाश्रयाने अनेक खेळ कोल्हापुरवासीयांच्या रक्तात भिनले आहेत. याचा प्रत्यय आज पुन्हा अनुभवायला आला. कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय नेमबाजपट्टू स्वप्नील सुरेश कुसाळे याने पॅरिस येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल मिळवून संपूर्ण देशाची मान उंचावली आहे. स्वप्नील कुसाळे याचा या ऐतिहासिक कामगिरीचा भारतीय आणि कोल्हापूरकर म्हणून नक्कीच अभिमान आहे. सुमारे ७२ वर्षानंतर महाराष्ट्रातील खेळाडूने वैयक्तिक क्रीडा प्रकारात मिळविलेले पदक राज्यातील खेळाडूंना प्रेरणादायी आहे. त्याच्या या उत्तुंग कामगिरी बद्दल त्याचे व त्याच्या प्रशिक्षकांचे हार्दिक अभिनंदन करताना त्याच्या भावी कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.
 यावेळी युवासेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद चव्हाण, शहरप्रमुख विश्वदीप साळोखे, शहरप्रमुख पियुष चव्हाण, शहरप्रमुख मंदार पाटील, युवतीसेना शहरप्रमुख नम्रता भोसले, शहरप्रमुख तेजस्विनी घाटगे, जिल्हासमन्वयक अविनाश कामते, शहरसमन्वयक शैलेश साळोखे, सरचिटणीस दादू शिंदे, सरचिटणीस कुणाल शिंदे, मंगेश चीतारे, अजिंक्य जाधव, विपुल भंडारे, शुभम ठोंबरे, अभि ढेरे, अभिजित कदम, रोहन शिंदे, आकाश झेंडे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes