एलिमेंट्री टीचर्स ऑर्गनायझेशन्सiच्या राष्ट्रीय महासचिवपदी सुधाकर सावंत
schedule11 Feb 25 person by visibility 108 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नगरपालिका महानगरपालिका राज्यप्रमुख सुधाकर सावंत यांची राष्ट्रीय पातळीवरील प्राथमिक शिक्षकांची संघटना ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एलिमेंट्री टीचर्स ऑर्गनायझेशन्सiच्या राष्ट्रीय महासचिवपदी निवड झाली. पाटणा येथे नुकत्याच झालेल्या सातव्या राष्ट्रीय संमेलनामध्ये ही निवड झाली.
सावंत हे तीस वर्षाहून अधिक काळ शिक्षक -कर्मचारी चळवळीत कार्यरत आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेत झालेल्या शिक्षक भरती प्रकरणी झालेल्या आंदोलनातून नेतृत्वाची सुरुवात झाली. शिक्षक समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला. शिक्षक समिती कोल्हापूर शहर चे सरचिटणीस व अध्यक्ष म्हणून काम केले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याचे कार्यालयीन चिटणीस, राज्यउपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. सध्या नगरपालिका महानगरपालिका प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. राज्य सरकारी , निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समिती, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ यांनी वेळोवेळी पुकारलेल्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला, त्याचबरोबर अनेक आंदोलनाचे नेतृत्वही करण्यात आघाडीवर होते.
शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी, मागण्यासाठी तसेच शिक्षण हक्क कायदा अस्तित्व यावा यासाठी नागपूर, मुंबई, दिल्ली पुणे भोपाळ व गोवा या ठिकाणी झालेल्या अनेक आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला, या निवडीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष बाबूलाल झा (झारखंड) राष्ट्रीय सचिव व्ही. अण्णामलाई (तामिळनाडू) सालिकराम पटेल (उत्तर प्रदेश) सुरेंद्र सौरभ (बिहार) के. नरसिंह रेड्डी (आंध्र प्रदेश) हरीमंदर पांडे (उत्तर प्रदेश) आदींचे सहकार्य लाभले. अशी माहिती शहराध्यक्ष संजय पाटील यांनी दिली आहे.