+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustगजापुरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संसारोपयोगी साहित्याचे वाटप, दहा लाखाची आर्थिक मदत adjust केआयटीतील संशोधनाचा दर्जा आता आंतरराष्ट्रीय स्तराचा होणार, अनुभवी प्राध्यापक सहभागी adjustएनआयटीचे विद्यार्थी तंत्रशिक्षण बोर्डाच्या परीक्षेत अव्वल adjustजरग विद्यामंदिरमध्ये नानासो जरग यांना श्रद्धांजली adjustकोल्हापुरात ट्रक महोत्सव उत्साहात ! चेतन मोटर्स - टाटा मोटर्सचा पुढाकार !! adjustबालिश नेत्याची मुलं विशाळगड आंदोलनात का नव्हती ? सतेज पाटलांचा खासदार महाडिकांना टोला adjustसदभावना रॅलीतून प्रकटला सामाजिक एकोप्यावरील विश्वास adjustशहरातील पाणी पुरवठासंबंधी भाजप नगरसेवकांची अधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठक adjustमहायुती, महाविकासला पर्याय परिवर्तन आघाडी ! पुण्यात विविध संघटना नेत्यांची बैठक !! adjustव्यवस्थापन परिषदेच्या बैठकीवर आघाडीचा बहिष्कार ! कुलगुरुंच्यावर मनमानी कारभाराचा आरोप !!
1000621806
1000615695
1000597139
1000567748
1000562876
1000551727
schedule10 Jul 24 person by visibility 324 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील दसरा चौक येथील चित्रदुर्ग मठ येथे महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसविण्याचा निर्णय झाला. पुतळा बसविण्याबरोबर महात्मा बसवेश्वर यांच्या तत्वाच्या व विचारांच्या प्रसारासाठी मठाच्या संवर्धनासाठी लागेल ते सहकार्य करू व पूर्व वैभव प्राप्त करून देऊ असा निर्धारही यावेळी करण्यता आला. 
 कर्नाटक शासननियुक्त चित्रदुर्ग मुख्य मठाचे प्रशासकीय अधिकारी व सेवानिवृत्त आय.ए.एस अधिकारी शिवयोगी कळसद, चित्रदुर्ग मठाचे मठाधिपती शिवानंद स्वामी व बंगलोरचे जिल्हाधिकारी नितिन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये महत्वाची बैठक पार पडली. चित्रदुर्ग बृहन्मठाची शाखा असलेल्या कोल्हापूर येथील चित्रदुर्ग मठाचे धर्माधिकारी व प्रमुख म्हणून परमपूज्य शिवानंद स्वामी यांची नेमणूक सरकारने केली आहे. चित्रदुर्ग बृहन्मठाचे अध्यक्ष असलेले शिवानंद कळसद यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर मठाची संपूर्ण जबाबदारी त्यांना देण्यात आली यावेळी विजापूर मठाचे सिद्धलिंग स्वामीजी उपस्थित होते. 
 लिंगायत समाजाच्या कार्यकर्त्या सरला पाटील म्हणाल्या,  चित्रदुर्ग मठाचा इतिहास सर्वांसमोर मांडला व  महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा चित्रदुर्ग मठामध्ये बसविण्याचा कोल्हापूरवासियांचा मनोदय असल्याचे नमूद केले.  
कोल्हापूर हे पुरोगामी चळवळीचे व राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे शहर म्हणून सर्वत्र ओळखले जाते. ११२ वर्षांपूर्वी अथणी येथे राजर्षी शाहू महाराज व श्री जयदेव जगद्गुरु भेट झाली झाली होती यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या विचाराने राजर्षी शाहू महाराज प्रभावित झाले व त्यांनी बसव साहित्य व बसव तत्वांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी दसरा चौक येथे जागा दिली. राजर्षी शाहू महाराजांच्या दसरा चौक येथील असलेल्या पुतळ्याजवळील याच मठात महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसविण्यासाठी लागेल ते सर्व सहकार्य मठाकडून करू असे आश्वासन चित्रदुर्ग मठाचे मठाधिपतीनी यावेळी दिले. 
यावेळी अजय डोईजड, सोमराज देशमुख, अनंत मुरगुडे, एस.आर हिरेमठ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राजशेखर तंबाके, बाबुराव तारळी, एस.एम.महाजन, बापू चौगुले, विलास आंबोळे, चंद्रशेखर बटकडली, श्रीकांत वडियार  उपस्थित होते.