Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दूध संस्था कर्मचारी संघटनेमार्फत गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफांचा सत्कारशुक्रवारी लख लख चंदेरी कार्यक्रमईएसआय हॉस्पिटलमध्ये लवकरच शंभर बेडची सुविधापाचगावमध्ये डीवाय पाटील मेडिकल कॉलेजचे  श्रमसंस्कार शिबीर जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड 20 मार्चपूर्वी होणार नागरी सुविधांबाबत कोल्हापूर नेक्स्टच्या सदस्यांची महापौरसोबत चर्चा मुख्याध्यापक अर्जित रजा रोखीकरणावर  लवकरच मार्ग काढू : शिक्षणमंत्री दादा भुसेमहापालिकेत शारंगधर देशमुख - आदिल फरासांत हमरीतुमरी! !भोई समाजाचे मार्चमध्ये राष्ट्रीय अधिवेशनज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील हे मराठी साहित्याच्या पिकाचे राखणदार - राजन गवस

जाहिरात

 

ईएसआय हॉस्पिटलमध्ये लवकरच शंभर बेडची सुविधा

schedule25 Feb 26 person by visibility 22 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : सर्किट हाउस नजीक असलेल्या ईएसआय हॉस्पीटलमध्ये लवकरच शंभर बेडची व्यवस्थ करण्यात येणार आहे.   सध्या तीस बेडची व्यवस्था आहे.  याबाबतची हॉस्पिटल डेव्हलपमेंट कमिटीची पहिली सभा झाली. कमिटी सदस्यांनी विविध कामांची पाहणी केली, यावेळी वैद्यकिय अधिक्षक अनुजा बेलोसे व डॉ.रविंद्र पवार यांनी माहिती दिली. सहायक कामगार आयुक्त विशाल घोडके, कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, इचलकरंजीचे नगरसेवक रणजीत पाटील, कामगार युनियन प्रतिनिधी प्रकाश कांबरे, इंडो काउंट तर्फे राजेश मोहिते, प्रदीप व्हरांबळे, ईएसआयसीचे माजी कर्मचारी मुल्ला उपस्थित होते. या हॉस्पीटलमध्ये एमआरआय आणि सीटी स्कॅनची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात इंजिनिअरिंग असोसिएशन तर्फे करण्यात आली. परंतु शंभर बेड या निकषात बसत नसल्याने पीपीपी प्रायव्हेट पब्लीक पार्टनरशिप सर्व्हीसेसव्दारे ही सेवा उपलब्ध करावी किंवा पीजी कॉलेज सुरू करणे असेही पर्याय देण्यात आले.  

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes