Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मुख्याध्यापक अर्जित रजा रोखीकरणावर  लवकरच मार्ग काढू : शिक्षणमंत्री दादा भुसेमहापालिकेत शारंगधर देशमुख - आदिल फरासांत हमरीतुमरी! !भोई समाजाचे मार्चमध्ये राष्ट्रीय अधिवेशनज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील हे मराठी साहित्याच्या पिकाचे राखणदार - राजन गवसमैदानासह नाट्यगृहाचेही बांधकाम चुकीच्या पद्धतीने, कार्यकर्त्यांनी वेधले लक्षमाझे शहर…माझी जबाबदारी ! एकाचवेळी चार हजार हात स्वच्छतेसाठी सरसावणार !संजय घोडावत यांना द ज्वेल्स ऑफ इंडिया पुरस्कारशक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात निदर्शनेभाजप उपाध्यक्षपदी गोपीचंद पडळकर, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी कृष्णराज महाडिकराज्यस्तरीय सोहळयात डॉ. हर्षला वेदक यांचा गौरव

जाहिरात

 

महापालिकेत शारंगधर देशमुख - आदिल फरासांत हमरीतुमरी! !

schedule25 Feb 26 person by visibility 235 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या राजकारणात मोठा भाऊ कोण यावरुन भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षांत चढाओढ सुरू असताना महापालिकेतही महायुतीतही सारे काही आलबेल नसल्याचे समोर आले. महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आदिल फरास यांच्यामध्ये हमरीतुमरी घडली. दोघांनीही एकमेकांना उद्देशून एकेरी भाषेचा वापर केला. जवळपास दहा मिनिटे हा गोंधळ सुरू होताल. महापौर रुपाराणी निकम यांनी यामध्ये हस्तक्षेप करत वाद मिटवला. तसेच दोघांनाही समज दिली.

महापालिकेत भाजपला २६, शिवसेनेला पंधरा तर राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या आहेत. महापालिकेतील विविध समिती सभापतिवरुन धुसफूस सुरू होती. त्या चर्चेदरम्यान वादाचे प्रसंग घडले होते. राष्ट्रवादीचा स्थायी समिती सभापतिपद व  महापौरपदावरील दावा हे वादाचे कारण असल्याचे बोलले जाते. मंगळवारी, २३ फेब्रुवारी २०२६ रोजी महापालिकेत अतिक्रमणबाबत बैठक आयोजित केली होती. आयुक्त के. मंजुलक्ष्मी, उपमहापौर अक्षय जरग, सभागृह नेते मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे, शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे व महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. या बैठकीत अतिक्रमणसंबंधी चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे गटनेते फरास यांनी अतिक्रमणासोबतच अन्य विषय चर्चेला आणले.

शिवसेनेचे गटनेते देशमुख यांनी ‘महापौरांनी अतिक्रमणबाबत बैठक बोलावली आहे. त्यासंबंधी चर्चा व्हावी. इतर विषयावर चर्चा नको.’असे सुनावले. यावरुन फरास व देशमुख यांच्यामध्ये वादाला सुरुवात झाली. फरास यांनी तावातावाने ‘नगरसेवक म्हणून महापालिकेत आम्हीही प्रतिनिधीत्व करतो. महापौरांच्या परवानगीने बोलत आहे. समोरुन ज्या भाषेत बोलणार, त्यांना त्या भाषेत उत्तर दिले जाईल.’असा पलटवार केला. त्यावर देशमुख यांनी फरास यांना उद्देशून,  ‘प्रत्येक विषयात मी बोलणारच, सगळयांनी माझे ऐकावे हा प्रकार खपवून घेणार नाही ’अशा शब्दांत तराटणी दिली. पदाधिकारी,अन्य गटनेते व अधिकाऱ्यांच्यासमोरच हा वाद रंगला. दोघांमध्ये वादावादी वाढत जाऊन एकेरी भाषेचा वापर झाला. या वादावादीत फरास यांनी टेबल आपटले. दोघांनीही एकमेकाकडे बोट करुन, ‘तुला मला बोलण्याचा अधिकार नाही’अशी भाषा वापरली. या गटनेत्यांतील वादामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले. हा प्रकार पाहून महापौर निकम या चांगल्याच संतापल्या. त्यांनी, दोघांनाही या विषयावर काही बोलू नका असे सुनावले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes