Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जज ददकोल्हापुरात आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग रिंगसाठी ! धनंजय महाडिकांची सहकार्याची ग्वाही !! महापालिकेसाठी आरक्षण निश्चित, निवडणुकीसाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग ! इच्छुक लागले तयारीला !!कोल्हापूर शहरात बिबट्याचा धुमाकूळ ! पोलिसावर झडप, चौघे जखमी!!इंद्रधनुष्य युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठाला उपविजेतेपदकत्तल केलेल्या झाडांना श्रद्धांजली वाहून प्रशासनाचा निषेधमहाविकास आघाडीला स्वाभिमानीची साथ ! सतेज पाटील, राजू शेट्टी, गणपतराव पाटील एकत्र !!राजारामपुरीतील रस्ते होणार चकाचक,दहा कोटीचा निधी मंजूर -आमदार राजेश क्षीरसागरडीवाय पाटील अभियांत्रिकीच्या दहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीखोल खंडोबा- शिपुगडे तालीम परिसरातील विकासकामांचे उद्घाटन

जाहिरात

 

शहाजी महाविद्यालयात रंगले श्रावणधारा कवी संमेलन

schedule12 Aug 24 person by visibility 606 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात सोमवारी श्रावणधारा कवी संमेलन उत्साहात  झाले.  पस्तीसहून अधिक प्राध्यापक,विद्यार्थ्यांनी या कवी संमेलनामध्ये सहभाग नोंदवून उत्स्फूर्तपणे कविता सादर केल्या.या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण हे होते. मराठी विभाग, सांस्कृतिक विभाग, शिवाजी ग्रंथालय आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त श्रावणधारा हे कवी संमेलन झाले.
   प्रारंभी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य  शानेदिवाण व सहाय्यक ग्रंथपाल यु. यु. साळोखे यांच्या हस्ते झाले. प्राचार्य शानेदिवाण म्हणाले, कविता हा उत्स्फूर्त भावनांचा अविष्कार आहे. कवितेला लय असतो, हुंकार असतो, ताल असतो, रिदम असतो.सौंदर्याचा लयबद्ध अविष्कार म्हणजे कविता असते. कवितेत निर्व्याज प्रेम असते. मानवी जीवनामध्ये व्यक्ती क्रांती करू शकते, प्रेम करू शकते अथवा ती रूक्ष राहू शकते. श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे ही बालकवींची कविता तसेच संदीप खरे यांची पाऊस , गुरु ठाकूर यांची कातरवेळी बसलो होतो, कवी सौमित्र यांच्या कवितांचे वाचनही त्यांनी यावेळी करून दाखवले. 
   या काव्य संमेलनात मराठी, हिंदी इंग्रजी विषयातील पाऊस, निसर्ग, श्रावण या विषयावरील मान्यवर कवींच्या आणि स्वतः तयार केलेल्या कवितांचे वाचन नवोदित कवींनी केले.  श्रुती संजय कुरणे, राजश्री पांडुरंग शेळके, अर्पिता अजय साबळे, संतोष सोनबा शेळके, श्रावणी बुरसे, ऋतिका माने,समीर बारे, भागोजी वरख, सादिया बागवान, फतीमा सय्यद, अमृता माने, तराना पेरवे, पायल जाधव या विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या. तसेच प्रा. डॉ.के एम देसाई, डॉ.सारिका कांबळे,  प्रा. अमर शेळके, डॉ विजय देठे, डॉ शोभा चाळके, प्रा. ऐश्वर्या हिंगमिरे,  प्रा. अक्षय भोसले, डॉ रचना माने, प्रा. अस्मिता इनामदार, डॉ एस एस पाटील यांनी उत्स्फूर्तपणे कवितांचे सादरीकरण केले. ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पल्लवी कोडक, डॉ. एन. एस. जाधव, डॉ. एस एस पाटील यांनी संयोजन केले.  प्रा.पी.के.पाटील यांनी  सूत्रसंचालन केले. डॉ.रचना माने यांनी आभार मानले. 
   यावेळी आयक्यूएसी समन्वयक डॉ. आर.डी.मांडणीकर, सहसमन्वयक डॉ. ए. बी. बलुगडे.,डॉ शिवाजी जाधव, डॉ. एस. एस राठोड  उपस्थित होते. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंगराव बोंद्रे यांचे  मार्गदर्शन मिळाले. यावेळी कवितांवरील ग्रंथांचे प्रदर्शन करण्यात आले. व्यसनमुक्तीची शपथ देखील विद्यार्थ्यांना देण्यात आली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes