Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
नेता सर्वसामान्यांचा ! दादा  कार्यकर्त्यांचा !!जिल्हा परिषद मतदारसंघ मोठे - समस्या अनेक ! विकासकामांसाठी हवा कोट्यवधींचा निधी, महायुतीच्या सदस्यांनी मांडल्या नेत्यांच्यासमोर भावना!!डीवाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा पन्हाळगडाचा अभ्यास दौरादारु पिऊन कार चालविताना दोघांना उडविले, गोकुळच्या माजी चेअरमनांचा मुलगा पोलिसांच्या अटकेतमहापालिका - गार्डन्स क्लबतर्फे पाच डिसेंबरला विशेष कार्यक्रमवेतनपथक कार्यालयास पूर्ण वेळ कर्मचारी द्या,   खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाची मागणीविद्यार्थ्यांनी दिलेले प्रेम हीच माझ्या आयुष्याची शिदोरी - सागर बगाडेदहा -दहा महिन्याचा महापौर ठरलंय…मात्र मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्यांचा आदेश आमच्यासाठी अंतिमआयुष्यात स्ट्रेस हा ताटातल्या मिठाईइतकाच असावा, माणसांनी अवाजवी अपेक्षा न ठेवल्यास जीवनयात्रा आनंदयात्रा बनतेकलेच्या प्रसारासाठी सागर बगाडेंनी महाराष्ट्रभर दौरा करावा, संपूर्ण प्रवास खर्च उचलू - मंत्री चंद्रकांत पाटील

जाहिरात

 

डीवाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा पन्हाळगडाचा अभ्यास दौरा

schedule23 Nov 26 person by visibility 19 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: इतिहास, कला आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कसबा बावडा, कोल्हापूर यांच्या आर्ट अँड क्राफ्ट, फोटोग्राफी आणि मूव्ही क्लबतर्फे प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी पन्हाळगडावर एकदिवसीय कृतीआधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. २१ नोव्हेंबर रोजी झालेल्या या कार्यशाळेत ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

पारंपरिक वर्गशिक्षणाच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष अनुभवातून कला आणि इतिहास समजून घेण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. तिलोत्तमा पाडळे यांनी विद्यार्थ्यांना सावली रेखाटन तंत्राची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पन्हाळगडावरील ऐतिहासिक वास्तू आणि परिसरातील विविध दृश्यांचे प्रत्यक्ष रेखाटन केले. गडावरील ऐतिहासिक वास्तूंचे सौंदर्य आणि स्थापत्यवैशिष्ट्ये छायाचित्रांच्या माध्यमातून टिपण्यासाठी प्रा. मकरंद काईगडे यांनी मार्गदर्शन केले. विविध कोन, प्रकाशयोजना आणि छायाचित्रण तंत्रांचा वापर करून विद्यार्थ्यांनी वास्तूंचे छायाचित्रण केले.

प्रा. मनजीत जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, त्यांचे नेतृत्वगुण आणि पन्हाळगडावरील ऐतिहासिक रणसंग्राम याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना रेखाटन, छायाचित्रण आणि चित्रपट माध्यमांचा प्रत्यक्ष अनुभव मिळण्यासोबतच ऐतिहासिक वारसा, कलात्मक दृष्टी आणि निरीक्षण कौशल्य विकसित करण्याची संधी मिळाली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील,  विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संजय पवार, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. महेश शेलार यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes