शिंगणापूर प्रशालेच्या आठवणीत हरवले वरिष्ठ अधिकारी, विजय सुर्यवंशींनी दिल्या आठवणींना उजाळा
schedule30 Sep 24 person by visibility 449 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रिडा प्रशाला शिंगणापूर या विद्यानिकेतन नवी ओळख प्राप्त करून देणारे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी मित्र परिवारासह प्रशालेस भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी प्रशालेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच प्रशालेचे विद्यार्थी ऑलिम्पिक पदक विजेते विद्यार्थी घडावेत अशी भावना व्यक्त केली
भेटी दरम्यान पुढील यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यामध्ये, श्रावणी लवटे (कुस्ती) एशियन चॅम्पियनशिप, रोहिणी देवबा ,एशियन चॅम्पियनशिप, तृप्ती पाटील एशियन चॅम्पियनशिप मलेशिया, पुनम पाटील व सायली पाटील खेलो इंडिया अखिल भारतीय विद्यापीठ सुवर्णपदक तर सरकारी सेवेत प्रविष्ट झालेले क्रीडा प्रशालेतील माजी विद्यार्थी दत्तात्रेय दिनकर पाटील (खो-खो) रत्नागिरी पोलीस, शुभम पाटील ,मुंबई पोलीस यांचा सत्कार करण्यात आला.
प्रशालेचे आजपर्यंत २५ विद्यार्थी खेळाडू गटातून सरकारी सेवेत दाखल झाले आहेत.याप्रसंगी सूर्यवंशी यांनी प्रशालेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी प्रशालेच्या एकंदरीत कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
जिल्हा नियोजन समितीमधून पाच कोटी रुपयांचा निधी इनडोअर हॉल व इतर भौतिक सुविधा यासाठी मंजूर झाला आहे. याबद्दल सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आभार मानले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कार्तिकेयन एस. यांनी प्रशालेचे प्रस्तावित नवीन शाळा बांधकाम, वसतीगृह, इनडोअर हॉल याबाबत माहिती दिली. प्रशालेकडे वैयक्तिक लक्ष असल्याचे नमूद केले. प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी देशामध्ये एक आदर्शवत क्रिडा प्रशाला नावारूपास येईल असा विश्वास व्यक्त करून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे सांगितले. याप्रसंगी भेटी दरम्यान जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हिंदुराव चौगुले, कुंडलिक पाटील, प्रशासनाधिकारीसमरजित पाटील आदी उपस्थित होते.