+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustअजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची यादी, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटलांचा समावेश adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश adjust कोल्हापुरात काँग्रेसचा सरप्राइज चेहरा कोण ? आज उत्तर मिळणार ! adjust शिवसेनेकडून आमदार प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरकेंना उमेदवारी adjustदक्षिणमध्ये पाटील, महाडिकांनी घेतले अर्ज ! उत्तरसाठी अर्ज घेणाऱ्यांत व्ही.बी, सत्यजित कदम यांची नावे !! adjustदूध उत्पादकांसाठी खुशखबर, गोकुळतर्फे नवीन ४००० बायोगॅस मंजूर ! चेअरमन अरुण डोंगळे adjustप्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांंना ३५ हजार रुपयांचा दंड, ३०० किलो प्लॅस्टिक जप्त adjustराहुल आवाडे गुरुवारी अर्ज भरणार adjust कोल्हापुरात बाइकस्वारांची धूम
1001157259
1001130166
1000995296
schedule20 Sep 24 person by visibility 160 categoryमहानगरपालिका
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : यंदाचा नवरात्रोत्सव तीन ते बारा ऑक्टोबर दरम्यान असून जिल्हा प्रशासनाकडून तयारी वेगावली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी , गुरूवारी  आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी भाविकांसाठी दर्शन व्यवस्था, स्वच्छता, वाहनतळ, सुरक्षेसह, चांगल्या आरोग्य सेवा द्या अशा सूचना विविध विभागांना दिल्या.जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी नवरात्र उत्सवात शाही दसरा महोत्सवांतर्गत विविध पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन  आहे.
  बैठकीला अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, प्रांताधिकारी हरिष धार्मिक, अति. महापालिका आयुक्त राहुल रोकडे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे, पोलीस उपअधिक्षक अजित टिके, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, तहसिलदार स्वप्निल रावडे, जिल्हा पर्यटन समिती सदस्य आदित्य बेडेकर, प्रमोद पाटील, उदय गायकवाड आदी उपस्थित होते. 
  मंदिर परिसरातील धोकादायक इमारतींचीही पाहणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. आरोग्य पथकाबरोबर आपत्ती विषयक नियोजन करा. बचाव पथकांची नेमणूक करा.असेही अधिकाऱ्यांना सांगितले. 
...........
नऊ दिवस होणार विविध कार्यक्रम
जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी नवरात्र उत्सवात शाही दसरा महोत्सवांतर्गत विविध पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन केले जाते. तसेच मागील वर्षी पासून करवीर तारा पुरस्कारही सुरु करण्यात आला आहे. या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली. याही वर्षी महिलांचा जास्त सहभाग असणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. दसऱ्या दिवशीच्या मुख्य कार्यक्रमावेळी विविध मिरवणुकांध्ये ढोल, लेझीम, पारंपरिक नृत्य, कला तसेच जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष प्राविण्य मिळवलेल्या क्रीडापटूंचा सहभाग मिरवणुकीत असणार आहे. तसेच नवरात्रीत प्रत्येक दिवशी विविध कार्यक्रम यात पारंपरिक पोशाख दिवस, शालेय स्तरावर स्पर्धांचे आयोजन, करवीर तारा पुरस्कार वितरण, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पारंपरिक युध्द कला, ई. कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.