Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विवेकानंद कॉलेजमध्ये शुक्रवारी डॉ. अच्युत  गोडबोले  यांचे  व्याख्यान  प्राथमिक शिक्षकांचे वेतन एक तारखेलाच करा- शिक्षक संघाची शिक्षणाधिकाऱ्यांच्यासोबत बैठककोल्हापुरात दोन दिवसीय कंदमुळे-औषधी वनस्पतींचा उत्सवकोल्हापूरचे विमानतळ जगाच्या नकाशावर नेणारा खासदार सुधाकरबुवा डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सव शुक्रवारपासून, तीन दिवस सांगितीक मेजवानीएसटीच्या जागेवर प्रत्येक जिल्हयात रुग्णालय, कोल्हापूर, पुण्यातील रुग्णालयासंबंधी सादरीकरण अधिकारी-कर्मचाऱ्यांची क्रिकेटची सामने, संतोष जोशी, अतुल आकुर्डे, सचिन सांगावकरांनी लुटला फलंदाजीचा आनंदसुरेंद्र जैन परिवारातर्फे सीपीआरला एक हजार चष्मे प्रदानश्री.आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालयात वाचन संकल्प उपक्रमआंतरराष्ट्रीय खेळाडूंशी संवाद, तरुण खेळाडूंच्या पाठीवर शाबासकीची थाप ! कोल्हापूर बॅडमिंटनचा सुवर्णसोहळा !!

जाहिरात

 

डीवाय पाटील हॉस्पिटलमध्ये महिलासाठी स्वतंत्र सर्जरी-मेडिसिन विभाग

schedule13 Aug 24 person by visibility 258 categoryआरोग्य

पूजा ऋतुराज पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन 
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : डॉ डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये महिलासाठी स्वतंत्र सर्जरी आणि मेडिसिन विभाग सुरू करण्यात आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुविधांनीयुक्त असलेल्या महिलासाठीच्या या स्वतंत्र विभागाचे उद्घाटन डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटीच्या सल्लागार पूजा ऋतुराज पाटील आणि वृषाली पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते झाले. 
 डी. वाय पाटील मेडिकल कॉलेजचा ३५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महिलासाठीचा या स्वतंत्र सर्जरी आणि मेडिसिन विभागाचा शुभारंभ करण्यात आला. अत्यंत अनुभवी डॉक्टर, परिचारिका आणि रुग्ण सहाय्यक, कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध असतील. या विभागात १२० बेड असून यातील साठ बेड हे प्रसुती विभागासाठी आहेत. या विभागात पंधरा डॉक्टर, प्रशिक्षणार्थी डॉक्टर, अद्यावत व्हेंटिलेटर, विविध अतिदक्षता विभाग व अन्य सुविधा उपलब्ध आहेत.
दरम्यान, हॉस्पीटलमध्ये मोफत प्रसूती सेवा सुरु करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड यांनी यावेळी दिली. यामध्ये नैसर्गिक प्रसूती, सिझेरियन, जोखमीच्या प्रसूती आदी सर्व सेवा व औषधोपचार पूर्णपणे मोफत दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
 नव्या विभागाच्या उद्घाटन प्रसंगी नव्यान सुरु झालेल्या या विभागाच्या उद्घाटन प्रसंगी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, उपप्राचार्य डॉ. आशालता पाटील, उपअधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालाप्पा, आयक्यूएसी डायरेक्टर डॉ. शिंपा शर्मा, डॉ. शीतल मिरचुटे, डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदेचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता, डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, सी.एच.आर.ओ श्रीलेखा साटम, उपकुलसचिव संजय जाधव, कृष्णात निर्मळ, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, तेजशील इंगळे, स्कूल ऑफ इंजीनिअरिंगचे डायरेक्टर डॉ. अजित पाटील, नर्सिंग कॉलेज प्राचार्य डॉ. उमारणी जे., फार्मसी कॉलेज प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे, फ़िजिओथेरपी प्राचार्य डॉ. अमृत कुंवर रायजादे, हॉस्पिटलीटीचे प्राचार्य रुधीर बारदेस्कर, डॉ. आर. एस. पाटील, प्रोजेक्ट हेड सदानंद सबनीस  उपस्थित होते.


जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes