कोल्हापूरचे विमानतळ जगाच्या नकाशावर नेणारा खासदार
schedule15 Jan 25 person by visibility 83 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन : भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचा पंधरा जानेवारी रोजी वाढदिवस. या वाढदिनाच्या निमित्ताने प्रा. अशोक पाटील-पोहाळेकर यांनी खासदार महाडिक यांच्या कार्याची ओळख करुन दिली आहे. महाडिक यांचे सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कामगिरीसोबतच कोल्हापूरचे विमानतळ विस्तारीकरण, विविध शहरांशी कोल्हापूरचा हवाई कनेक्ट राहावा म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न यावर प्रकाशझोत टाकला आहे. कोल्हापूरचे विमानतळ जगाच्या नकाशावर नेणारा खासदार म्हणजे धनंजय महाडिक अशा शब्दांत कार्याचे कौतुक केले आहे. तो त्यांच्याच शब्दांत पुढीलप्रमाणे…
“आदर्श लोकप्रतिनिधी 'आपला माणूस आपला खासदार हीच त्यांची खरी ओळख आहे. सर्वजनवादी लोक कल्याणकारी विचारधारेची संस्कृती जपली. सहकार राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात सतत कार्यरत असणारा. शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन आयोजित करुन नवीन तंत्रज्ञान, शेतीतील प्रयोग त्यांच्यापर्यत पोहचविणारा हा नेता. तरुणातही ते लोकप्रिय आहेत. कोल्हापूर हे विकासाच्या ट्रॅकवर असले पाहिजे, या शहराची प्रगतीचा आलेख सतत उंचावत राहिला पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील असतात.
कोल्हापूरचे धार्मिक महत्त्व, सांस्कृतिक समृद्धी, भौगोलिक विविधता, ऐतिहासिक वारसा, आर्थिक संपन्नता ही या शहराची शक्तीस्थळे. महाडिक यांनी कोल्हापूरचे विमानतळ आधुनिक करुन या शहराला वेगवान आणि गतिमान केले. 'बंद पडलेले विमानतळ', 'बंद पडलेली’ विमान सेवा सुरु केली त्यांच्या अथक प्रयत्नाने कोल्हापूरचे विमानतळ जगाच्या 'हवाई' नकाशावर दिमाखाने चमकत आहे. विमानतळाची इमारत वैशिष्टयपूर्णरित्या साकारले आहे. विविध शहराशी कोल्हापुरातून विमान प्रवास करण्याची सुविधा निर्माण केले.
कोलापूरचा सर्वसामान्य माणूस' अब दिल्ली दूर नहीं! असे आनंदाने सांगतों याचे मोठे श्रेय खासदार महाडिक यांचे जाहेत. त्यांच्या यशस्वी कामगिरीमुळे विमानतळासाठी आवश्यक ८१ एकर जागेचे संपादन झाले. कोल्हापूरच्या विमानतळावर वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यासाठी आपली राजकीय शक्ती खासदार महाडिक उभे करीत आहेत. पूर्वी कोल्हापूर विमानतळाची १३७० मीटर धावपट्टी होती. पहिल्या टप्यात १९७० मीटर पर्यंत धावपट्टीचा विस्तार केला आहे. आता अगदी काहीच दिवसांत कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी २३०० मीटर होणार आहे. यामुळे मोठया विमानांची वाहतूक सुरु होऊन कोल्हापूर वायुवेगाने प्रगतीसाठी मार्गस्थ होईल. कोल्हापूर हवाई कार्बेा हब निर्माण व्हावं अशी ईच्छा छत्रपती राजाराम महाराज, उद्योगपती रतन टाटा यांच्यासह अनेकांची होती. त्या अनुषंगाने कोल्हापूर विमानतळ सर्व सुविधायुक्त करण्याचा ध्यास खासदार महाडिकांनी घेतला आहे.