प्राथमिक शिक्षकांचे वेतन एक तारखेलाच करा- शिक्षक संघाची शिक्षणाधिकाऱ्यांच्यासोबत बैठक
schedule15 Jan 25 person by visibility 30 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्राथमिक शिक्षकांचा पगार हा एक तारखेला करणे बंधनकारक असून तशी कार्यवाही करा. विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक व विषय शिक्षक यांच्या पदोन्नती प्रक्रिया तत्काळ राबवा अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल माने, सरचिटणीस राहुल पाटणे यांच्यासह शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने सांगली जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्याकडे केली.
प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नावर शिक्षणाधिकारी यांच्या दालनात बैठक झाली. सांगली जिल्हा परिषदेचा मॉडेल स्कूल हा महत्त्वकांक्षी उपक्रम संपूर्ण राज्याला आदर्शवत ठरत आहे. नुकतेच महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या उपक्रमाचा सर्व आढावा सांगली जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्याकडून घेतला. या बैठकीच्या वेळी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाकडून शिक्षणाधिकारी गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गायकवाड यांनी प्राथमिक शिक्षकांच्या. सर्वच प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे आदेश शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीत विविध प्रलंबित प्रश्नावरती तब्बल दोन ते अडीच तास चर्चा झाली. शिक्षकांचे पगार एक तारखेला करणे, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, विषय शिक्षक यांच्या पदोन्नत्या तत्काळ करणे, वरिष्ठ वेतन श्रेणी,निवड श्रेणीचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढणे, सेवेत कायम, हिंदी मराठी सूट या प्रस्तावांना तात्काळ मंजुरी, सांगली जिल्हा परिषदेकडे नियुक्त झालेले नवनियुक्त शिक्षण सेवक हे इतर सेवा सोडून शिक्षक म्हणून रुजू झाले आहेत त्यांचे सेवाजोड प्रस्तावांची नमुन्यात मागणी करून त्या प्रस्तावांना तात्काळ मंजुरी देणे, भविष्य निर्वाह निधी कर्ज प्रकरणे, वैद्यकीय बिले, पुरवणी बिले यांना तात्काळ मंजुरी देणे यासंबंधी चर्चा झाली.
बैठकीला अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघ जुनी पेन्शन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धैर्यशील पाटील, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल माने, सरचिटणीस राहुल पाटणे, भारत क्षिरसागर, धनाजी साळुंखे ,बाळू गायकवाड, संभाजी ठोंबरे, विजय साळुंखे, यशवंत गोडसे, संजय खरात, कृष्णा सावंत यांच्या सह सत्यजित यादव, बाबा वरेकर ,संदीप पवार, संभाजी हंकारे,महंम्मदअली जमादार, प्रवीण एटम, नंदकिशोर महामुनी, सागर कांबळे, प्रकाश पवार ,उदय चव्हाण, उत्तम पाटील उपस्थित होते.