संजय भोसले, दिवाकर कारंडे पुन्हा महापालिकेत कामावर रुजू
schedule14 May 26 person by visibility 14 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : तीन वर्षाहून अधिक काळ निलंबित असलेले अधिकारी संजय भोसले व दिवाकर कारंडे हे पुन्हा महापालिकेत कामावर रुजू झाले. भोसले यांच्याकडे यंत्रशाळेच्या व्यवस्थापकपदाचा तर कारंडे यांना विवाह नोंदणी विभागाच्या निबंधकपदाचा कार्यभार सोपविला आहे. घरफाळा विभागातील अनियमितता, भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून या दोघांच्यावर फोजदारी कारवाई झाली होती. त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. शिवाय विभागीय चौकशी लावण्यात आली होती. दरम्यान महापालिकेच्या निलंबन आढावा बैठकीत या दोघांना पुन्हा कामावर रुजू घेण्याचा निर्णय झाला. न्यायालयीन आदेश व विभागीय चौकशीच्या निर्णयाच्या अधीन राहून त्यांना कामावर हजर करुन घेतले आहे.