संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा एक मे रोजी लोकार्पण सोहळा
schedule01 Apr 26 person by visibility 111 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र दिनी एक मे 2026 रोजी पार पडेल असे खात्री राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. त्यांनी बुधवारी एक एप्रिल रोजी, केशवराव भोसले नाट्यगृहाचे पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सक्त सूचना केल्या. " जबाबदारीची जाणीव ठेवा, कामात कोणतीही त्रुटी नको " असे बजावले. याप्रसंगी अधिकाऱ्याने एक मेपर्यंत केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम पूर्णत्वास येईल असे सांगितले. त्यावर आमदार क्षीरसागर यांनी एक मे रोजी महाराष्ट्र दिनी नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा पार पडला अशी खात्री व्यक्त केली
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरणाचे काम सुरु आहे. आमदार क्षीरसागर यांनी पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. रंगकर्मी, कलाकार यांच्या सूचनांचा आदर ठेवा, त्यांना विश्वासात घ्या. जबाबदारीची जाणीव ठेवा, कोल्हापूरच्या अस्मिता असलेले या कामात कोणतीही त्रुटी राहता कामा नये, असे सांगितले.
कोल्हापूरच्या अस्मितेला साजेसे काम व्हावे ही सर्वांची भावना आहे. रंगकर्मींना अपेक्षित काम व्हावे त्या दृष्टीने त्यांच्या सूचनांवर योग्य अंमलबजावणी करून नियोजनबद्ध रीतीने काम सुरू असल्याने कामास थोडा कालावधी अपेक्षित आहे. पूर्वीप्रमाणे या ठिकाणी सुमारे 722 प्रेक्षक वर्गाची आसन क्षमता ठेवण्यात येणार आहे. यासह स्टेज साऊंड लाईट आधी अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करण्यात येणार आहे. याप्रसंगी अधिकाऱ्यानी नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम एक मे पर्यंत पूर्णत्वास येईल असे सांगितले . त्यामुळे येणाऱ्या महाराष्ट्र दिनी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा पार पडेल अशी खात्री आमदार क्षीरसागर यांनी दिली.यावेळी महानगरपालिका शहरअभियंता रमेश मस्कर, उपशहरअभियंता सुरेश पाटील, अनुराधा वांद्रे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रणजीत मंडलिक, सचिन पाटील, गणेश रांगणेकर, श्रीकांत मंडलिक, राहुल चव्हाण, आश्पाक आजरेकर आदी उपस्थित होते.