Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी वर्षा सिंघण यांची तडकाफडकी बदलीमहापालिकेत नगरसेवक- अधिकाऱ्यांत खडाजंगी, आयुक्तांनी दिले कारवाईचे आदेशकेडीसीसी बँकेचा व्यवसाय २१ हजार ३७१ कोटींवर, ढोबळ नफा २८७ कोटीनालेसफाईचा सविस्तर कृती आराखडा दोन दिवसात सादर करा - राजेश क्षीरसागर मंत्री चंद्रकांत पाटील म्हणजे एक मुक्त विद्यापीठ, हसन मुश्रीफांची कोपरखळी शिवसेना ठाकरे गटाच्या शहर प्रमुखपदी  मंजीत माने, कोल्हापूर दक्षिण प्रमुखपदी विशाल देवकुळे चिन्मय मिशनचे स्वामी अभेदानंद यांची कोल्हापूरात व्याख्यानमालाग्रामीण भागालाही शहरांप्रमाणेच २५ दिवसांत गॅस सिलेंडर द्यावेत : खासदार धैर्यशील मानेशिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी २२ उमेदवार शर्यतीत ! शुक्रवारी - शनिवारी मुंबईत मुलाखती ! !१२०० प्राथमिक दूध संस्थासंदर्भात गोकुळची चौकशी, दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती

जाहिरात

 

केडीसीसी बँकेचा व्यवसाय २१ हजार ३७१ कोटींवर, ढोबळ नफा २८७ कोटी

schedule02 Apr 26 person by visibility 16 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या आर्थिक वर्षातील म्हणजेच ३१ मार्च २०२६ अखेर २१ हजार ३७१ कोटी रुपये व्यवसायाचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. बँकेचा या आर्थिक वर्षातील ढोबळ नफा २८७ कोटी आहे. बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

,गेल्या पाच वर्षांचा आढावा घेतला तर या पंचवार्षिक मध्ये सर्वच पातळ्यांवर संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, सभासद संस्था आणि शेतकऱ्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. बँकेकडे  १२,३०९ कोटींच्या  ठेवी आहेत. बँकेने केलेली गुंतवणूक रू. ५,०३२  कोटी तर बँकेने वितरित केलेली कर्जे रू. ९, ०६२ कोटी आहेत. केंद्र कार्यालयासह बँकेच्या सर्व म्हणजे १९१ शाखा सलग नफ्यात असल्याचाचे त्यांनी सांगितले. सन २०२६- २७ या येत्या आर्थिक वर्षातील म्हणजेच  ३१ मार्च २०२७ अखेर १५, ००० कोटी ठेवी आणि ढोबळ नफा ४०० कोटी रुपये इतके उद्दिष्ट आहे. ढोबळ एन. पी. ए. प्रमाण तीन टक्केच्या आत तर नक्त एन. पी. ए. प्रमाण : शून्य टक्के असल्याचे त्यांनी सांगितले.          
पीएम, सूर्यघर मोफत वीज योजना सबंध जिल्हाभर प्रभावीपणे राबविणारी देशातील पहिली बँक ठरत आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कर्ज योजनेची कर्ज मर्यादा ३०,००० वरून रू. ५०,००० हजार केल्याचे त्यांनी घोषित केले. ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए. आय. वापरासाठी अनुदान योजना जाहीर केली. स्वर्गीय आमदार पी. एन  पाटील पीक प्रोत्साहन अनुदान योजनेचा त्यांनी उल्लेख केला. यावेळी माजी आमदार राजेश पाटील,  माजी आमदार संजय घाटगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर,  जिल्हा बँकेचे संचालक  ए. वाय. पाटील, प्रा. अर्जुन आबिटकर, भैया माने, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, विजयसिंह माने, श्रुतिका काटकर,  स्मिता गवळी उपस्थित होते.मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांनी स्वागत केले

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes