Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळच्या व्यासपीठावरून काँग्रेसच्या आमदारांची मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महायुती सरकारवर टीकास्त्र, हा विषय न समजण्यासारखाथेट पाईपलाईनचे श्रेय घेता मग जबाबदारी का झटकता ? राजेश क्षीरसागरांचा सतेज पाटलांना पलटवारआता चौथी-सातवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा ! एकवेळची बाब म्हणून फेब्रुवारीत पाचवी-आठवीची परीक्षा !शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय महिला बास्केटाबॉलल स्पर्धेत तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी मुलींच्या संघास विजेतेपदसावित्रीबाई फुले रुग्णालयातील अतिदक्षता विभाग नऊ दिवस बंदनोव्हेंबर महिन्यापासून मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा टप्पा तीन अभियानसातव्या वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी, केएमटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड ! कामगारांनी मानले आमदारांचे आभार!! उपकुलसचिव वैभव ढेरे यांना पितृशोकशेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार न दिल्यास तीव्र आंदोलन – राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटीलआम्ही गोकुळच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठे केले, कोणाच्या जावईला नव्हे - सतेज पाटलांचा महाडिकांच्यावर हल्लाबोल

जाहिरात

 

थेट पाईपलाईनचे श्रेय घेता मग जबाबदारी का झटकता ? राजेश क्षीरसागरांचा सतेज पाटलांना पलटवार

schedule18 Oct 25 person by visibility 164 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : दिवाळी अभ्यंगस्नानाचे स्वप्ने दाखवून कोल्हापूरच्या जनतेची दिशाभूल करण्याचे काम करण्यात आले. पालकमंत्री पद, महापालिकेत सत्ता उपभोगताना पाणी पुरवठ्याची वितरण व्यवस्था कुचकामी असल्याचे दिसले नाही काय? कुचकामी वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत? असा सवाल उपस्थित करत थेट पाईपलाईन योजनेचे श्रेय घेता मग जबाबदारी का झटकता? असा प्रतिसवाल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आमदार सतेज पाटील यांना केला. आमदार पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या व्यक्तव्यावर आमदार  क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रतिसवाल उपस्थित केला.

दरम्यान आमदार पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना महायुतीवर टीकास्त्र सोडले होते. महायुतीच्या सरकारमुळे कोल्हापूरची वाताहात झाली. सरकारने कोल्हापूर शहरात एकही चांगले काम केले नाही असा टोला लगााविला होता. तसेच थेट पाइपलाइनने पुईखडीपर्यत पाणी आणण्याची जबाबदारी माझी होती, तेथून पुढे महापालिका प्रशासनान नागरिकांना पाणी पुरवठा करायच होता. वितरण व्यवस्था कुचकामी असताना योजनेची बदनामी कशासाठी ? असा सवाल पाटील यांनी केला होता.पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महापालिकेत घेतलेल्या बैठकीवरुन आबिटकर व आमदार राजेश क्षीरसागर यांचे जुळले की काय माहित नाही. खड्डे दुरुस्तीसाठी महापालिकेकडे पैसे नाहीत आणि पालकमंत्री अधिकाऱ्यांना धारेवर धरत आहेत असा टोला मारला होता.   

आमदार पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना क्षीरसागर यांनी म्हटले आहे, थेट पाइपलाइन योजनेला  २०१२ मध्ये योजनेस तांत्रिक मान्यता देण्यात आली. डिसेंबर २०१३ मध्ये प्रशासकीय मान्यता होवून प्रत्यक्ष कामास सुरवात झाली. त्यावेळी आमदार पाटील पालकमंत्री होतेच यासह महानगरपालिकेत त्यांच्याच कॉंग्रेस पक्षाची सत्ता होती. ही योजना तब्बल १० वर्षांनी कार्यन्वित झाली. दिवाळीचे अभ्यंगस्थान योजनेच्या पाण्याने करून श्रेय घेण्यात आमदार  पाटील सर्वात आघाडीवर होते. पाईपलाईनला वारंवार लागणारी गळती, यंत्रणा बंद पडण्याच्या घटनांबाबत अबोला धरला होता. त्यांच्या कॉंग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्यांनी या योजनेत सुमारे ७० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला होता. याबाबतही आमदार पाटील यांनी मौन बाळगले आहे. गळकी थेटपाईपलाईन योजना जनतेच्या माथी मारण्याचे काम करणारे आमदार पाटील योजनेचे अपयश लपविण्यासाठीच जनतेत दिशाभूल करणारी वक्तव्ये करत आहेत. शहरातील वितरण व्यवस्था कुचकामी असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. ही वितरण व्यवस्था सुधारण्याची जबाबदारी त्यांनी महापालिकेत सत्तेत असताना, पालकमंत्री पद असताना का घेतली नाही. स्वत: केलेले पाप महापालिका प्रशासनाच्या माथी मारण्याचे काम आमदार पाटील करतआहेत.

कोल्हापूरच्या जनतेने आम्हाला विश्वासाने निवडून दिले आहे. जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जर एखादी यंत्रणा सुधारायचीच असेल तर त्याचा सातत्याने पाठपुरावा करणे गरजेचे आहे. पालकमंत्री  प्रकाश आबिटकर आणि आम्ही महायुतीचे सर्वच आमदार प्रशासनावर वचक ठेवून जनतेची कामे करून घेत असल्यानेच माजी पालकमंत्री यांना त्यांचा अकार्यक्षमपणा जाणवत असल्याने त्यांना आम्ही करण्याऱ्या कामाचे पोटशूळ उठले आहे, अशा शब्दांत क्षीरसागर यांनी पलटवार केला.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes