काँग्रेसकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी राहुल माने , सुनील मोदी मुस्ताक मलबारी
schedule17 Feb 26 person by visibility 37 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी माजी नगरसेवक राहुल माने, सुनील मोदी आणि मुस्ताक मलबारी यांचे अर्ज दाखल झाले. मंगळवारी दुपारी काँग्रेसतर्फे या तिन्ही उमेदवारांची अर्ज अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडे सादर केले. यावेळी नगरसचिव सुनील बिद्रे उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, नगरसेवक प्रतापसिंह जाधव, अर्जुन माने दुर्वास कदम, विनायक फाळके, अमर समर्थ, सुनील शेंडे, मोहन सालपे, विकास सूर्यवंशी, सिनेट सदस्य अभिषेक मिठारी, अजित जाधव आदी उपस्थित होते.