हातकणंगले गटशिक्षणाधिकारीपदी रवींद्रनाथ चौगुले
schedule18 Oct 24 person by visibility 1089 categoryसंपादकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : हातकंणगले पंचायत समिती शिक्षण विभागात गटशिक्षणाधिकारीपदी रवींद्रनाथ चौगुले रुजू झाले आहेत. उपशिक्षणाधिकारी रवींद्रनाथ चौगुले हे शिक्षण उपनिरीक्षकपदी उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे ऑगस्ट २०२१ पासून तीन वर्षे कार्यरत होते. तेथून त्यांची बदली हातकणंगले पंचायत समिती शिक्षण विभागात गटशिक्षणाधिकारी पदी झाली आहे.त्यांनी करवीर येथे तीन वर्षे गटशिक्षणाधिकारी पदी व भुदरगड तालुक्यात ४ वर्षे गटशिक्षणाधिकारी पदी कार्य केले आहे.तसेच नूतन विस्तार अधिकारीपदी नेमिनाथ पाटील व विस्तार अधिकारीपदी गुलाब गंजेली हे दोन विस्तार अधिकारी पदोन्नतीने रुजू झाले आहेत.