मेडिकल बिलाचा आरोप सिद्ध करा, आमदारकीचा राजीनामा देतो ! अन्यथा तुम्ही राजकीय संन्यास घ्या !! राजेश क्षीरसागरांचे खुले चॅलेंज
schedule27 Jul 25 person by visibility 330 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " माझ्या वडिलांच्या नावाच्या 86 लाखाच्या मेडिकल बिलावरून माझ्यावर जे आरोप होतात ते विरोधकांनी सिद्ध करावेत. आरोप सिद्ध झाले तर मी आमदारकीचा राजीनामा देतो, राजकीय संन्यास घेतो. जर आरोप जर सिद्ध नाहीत तर विरोधक राजकीय संन्यास घेणार आहेत काय " असे खुले आव्हान राज नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिले. शक्तिपीठ महामार्गावरूनही त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी व काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या नावाखाली आंदोलन करायचे आणि साखर कारखानदाराशी हातमिळवणी करायची, हा राजू शेट्टी यांचा उद्योग आहे. त्यांचा हा उद्योग लक्षात आल्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांना घरी बसवले. लोकसभेला त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. तसेच आमदार सतेज पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री होते, गृहराज्यमंत्री होते त्यांनी कोल्हापूरच्या शाश्वत विकासासाठी काय केले ? हे एकदा जाहीर करावे. केवळ सत्तेचा मलिदा खायचा आणि स्वतःच्या संस्था मोठ्या करायचा हेच त्यांचे काम असा खरमरीत टोलाही क्षीरसागर यांनी पत्रकाराशी बोलताना दिला. महापालिकेत त्यांची अनेक वर्षे सत्ता आहे, मात्र ते कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी देऊ शकले नाहीत.
आमदार क्षीरसागर म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग विकासाचा मार्ग आहे. शक्तीपीठच्या समर्थनार्थ माझा हेतू स्वच्छ आहे. शहर आणि जिल्हाच्या विकासाला गती मिळणार आहे म्हणून मी शक्तिपीठ महामार्गाचे समर्थन करत आहे. समर्थनासाठी माझ्या खांद्यावर कोणाची बंदूक ठेवली असा आरोप करणाऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध करा म्हणून त्यांच्या खांद्यावर कोणाची बंदूक आहे हे एकदा जाहीर करावे. शनिवारी शेट्टी व त्यांच्या बगलबच्चांनी बिंदू चौकात येऊन जो दिखावा केला. तो सारा प्रकार जनता ओळखून आहे. शिवसेनेचे संसदीय गटनेते व खासदार श्रीकांत शिंदे हे शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांच्यासोबत मी दिवसभर कार्यक्रमात व्यस्त होतो. त्यामुळे शेट्टी यांच्या आरोपाला उत्तर देऊ शकलो नाही. शेट्टी हे लोकांना भडकविण्याचे काम करत आहेत. त्यांनी मला दातृत्व शिकवू नये. त्यांचे आंदोलने आता पेड बनले आहेत. त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे सर्वश्रुत आहे. अशा पे-बाबांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देण्यास मी बांधील नाही. आमची बांधिलकी जनतेशी आहे. असेही क्षीरसागर यांनी सांगितले
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मतदान फेरपडताळणी संदर्भात बोलताना क्षीरसागर म्हणाले, " विरोधकांनी मागणी केलेल्या पाच बूथवरील मतदानाची पडताळणी सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार झाली. या फेरपडताळणीचा निकाल माझ्या बाजूने लागला आणि विरोधकांचा रडीचा डाव फसला. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नही हे सिद्ध झाले. विधानसभा निवडणुकीत जनतेने माझ्या बाजूने कौल दिला आहे हे विरोधक मान्य का करायला तयार नाहीत ? असा सवाली त्यांनी केला. मतदान पडताळणी प्रक्रियेतही कसबा बावडा येथील मतदान केंद्रावर विरोधकापेक्षा मला अधिकची मते मिळाले आहेत. कसबा बावडा हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. तेव्हा कसबा बावडा माझा अशा वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे. लोकांमध्ये निगेटिव्ह नरेटिव्ह सेट करणे हेच काँग्रेसचे काम आहे. त्यांना विकासकामांशी काही देणे घेणे नाही. येत्या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला चितपट करू. कसबा बावड्यातील जागा ही जिंकू असाही विश्वास आमदार क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
माझ्यावर आरोप करत काही जणांची राजकीय दुकानदारी सुरू आहे मात्र मी त्यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देण्यास बांधील नाही असे स्पष्ट करत आमदार क्षीरसागर म्हणाले थेट पाईपलाईन योजनेचे श्रेय कोणी लाटण्याचा प्रयत्न करू नये विधानभवनासमोर मी उपोषण केले होते त्यामुळे पाईपलाईन योजना मंजूर झाली. पत्रकार परिषदेवर कमलाकर जगदाळे उपस्थित होते.