Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
खासबाग मैदानाची स्वच्छता, दसऱ्यानंतर खासदार - आमदारांच्या निवासस्थानासमोर निदर्शनेसंजय घोडावत विद्यापीठाचा सोळा ऑक्टोबरला दीक्षांत समारंभ गोकुळच्या व्यासपीठावर आबिटकर –के. पी. एकत्र !  महायुतीच्या विजयात राधानगरी- भुदरगडचा सिंहाचा वाटा असेल ! !शिक्षकांशी संवाद, प्रश्नांची उकल! कौस्तुभ गावडेंची शहरातील शैक्षणिक संस्थांना सदिच्छा भेटी! !आरपीआय गवई गटाचा महाविकास आघाडीला पाठिंबा! प्रा. जयंत आसगावकर, हर्षदा देशमुखांनाना दिले पाठिंब्याचे पत्र!!सतेज पाटील गृहराज्यमंत्री असताना गोकुळची सूत्रे मुंबईतून हलत होती - मंत्री हसन मुश्रीफ यांचा पलटवार आमदार फंडातील शंभर टक्के निधी आसगावकरांनी शाळांसाठी खर्च केला, नावातच जयंत असल्यामुळे पराभव अशक्य : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील४४०० ठराव असल्याचा डांगोरा पिटता, मग शपथा कशाला घ्यायला लावता ? महायुतीचे नेते मुंबई - दिल्लीपुढे हतबल : सतेज पाटलांचा हल्लाबोलगोकुळ निवडणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी लढत !  नविद मुश्रीफ विरुद्ध शशिकांत खोत!!जुनी पेन्शन योजनेसह शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी प्रभावी पाठपुरावा करणार - कौस्तुभ गावडे

जाहिरात

 

एनईपी सुकाणू समिती सदस्यपदी प्राचार्य क्रांतिकुमार पाटील

schedule01 Sep 24 person by visibility 1142 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’च्या अंमलबजावणी संदर्भात येणाऱ्या अडचणी निवारण्यासाठी उपाययोजना व मार्गदर्शनकरिता राज्य सरकारने सुकाणू समितीची स्थापना केली आहे. राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारित या समितीची स्थापना झाली आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू नितीन करमळकर हे सुकाणू समितीचे अध्यक्ष आहेत. दरम्यान या सुकाणू समितीचे सदस्य म्हणून शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांची निवड करण्यात आली आहे. प्राचार्य पाटील यांचा शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव, विविध पदावर काम करताना उमटविलेला ठसा, प्रशासकीय, शैक्षणिक संस्थात्मक काम आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील कामाचा आवाका याची दखल घेत त्यांची सुकाणू समितीवर निवड केली आहे. प्राचार्य पाटील हे ताराराणी विद्यापीठाचे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. कमला कॉलेजचे प्राचार्यपद भूषविले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावरील कामाचा आवाका आहे. प्राचार्य संघटनेच्या कामात आघाडीवर आहेत.
राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने स्थापलेल्या या समितीत एकूण २० सदस्य आहेत. यापूर्वी या समितीवर सदस्य म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी टी शिर्के यांचा समावेश आहे. आता प्राचार्य पाटील यांच्या माध्यमातून कोल्हापुरातील आणखी एका अनुभवी व्यक्तिमत्वाची या समितीवर निवड झाली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes