Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विवेकानंद कॉलेजमध्ये शुक्रवारी डॉ. अच्युत  गोडबोले  यांचे  व्याख्यान  प्राथमिक शिक्षकांचे वेतन एक तारखेलाच करा- शिक्षक संघाची शिक्षणाधिकाऱ्यांच्यासोबत बैठककोल्हापुरात दोन दिवसीय कंदमुळे-औषधी वनस्पतींचा उत्सवकोल्हापूरचे विमानतळ जगाच्या नकाशावर नेणारा खासदार सुधाकरबुवा डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सव शुक्रवारपासून, तीन दिवस सांगितीक मेजवानीएसटीच्या जागेवर प्रत्येक जिल्हयात रुग्णालय, कोल्हापूर, पुण्यातील रुग्णालयासंबंधी सादरीकरण अधिकारी-कर्मचाऱ्यांची क्रिकेटची सामने, संतोष जोशी, अतुल आकुर्डे, सचिन सांगावकरांनी लुटला फलंदाजीचा आनंदसुरेंद्र जैन परिवारातर्फे सीपीआरला एक हजार चष्मे प्रदानश्री.आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालयात वाचन संकल्प उपक्रमआंतरराष्ट्रीय खेळाडूंशी संवाद, तरुण खेळाडूंच्या पाठीवर शाबासकीची थाप ! कोल्हापूर बॅडमिंटनचा सुवर्णसोहळा !!

जाहिरात

 

कोरे अभियांत्रिकेच्यावतीने वृक्षारोपण

schedule11 Aug 24 person by visibility 213 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनोमस) अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एनसीसी विभाग, एनएसएस विभाग, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या एनसीसी व श्रीमती भा. रा.यादव हायस्कूल सावर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने बच्चे सावर्डेच्या खडीचा डोंगरावर २५० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. हा खडीचा डोंगर सावर्डे गावाचे फुफ्फुस म्हणुन ओळखलं जातं. या हायस्कूल मधल्या विद्यार्थ्यांनी रोपे लावण्यासाठी लागणारे खड्डे दोन तासातच तयार केले.
त्यामध्ये वड, पिंपळ, निंब, बेहडा, उंबर, जांभुळ, चिंच, कदंब अशा देशी प्रजातीच्या वेगवेगळ्या जातीची झाडे महाविद्यालयातील व शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन वृक्ष लागवड करण्यात आली. लागवड केलेल्या रोपांच्या संवर्धनासाठी सावर्डे हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. यावेळी सावर्डे हायस्कूल मधील शिक्षकांनी सांगितले आम्ही प्रत्येक झाडाला त्या विद्यार्थ्याचं नाव देणार आहोत व ते झाडाचे लहान बाळाला सांभाळतो त्या पद्धतीने पाच वर्ष त्याचे संगोपन करणार आहोत.
यावेळी डीन डॉ. एस. एम. पिसे, प्र. प्राचार्य, डॉ. डी. एन. माने, प्रा. रणजीत नाईक, डॉ. एस. एस. खोत, प्रा गणेश कांबळे, प्रा. वरवंटे, प्रा. आर. जी. क्षीरसागर, सावर्डे हायस्कूलचे पी.आर.पाटील, आण्णा पाटील, डॉ.अंकुश यादव, महेश बच्चे, सुरेश माळकर, पोलीस पाटील सागर यादव उपस्थित होते. वृक्षारोपणासाठी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे, वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ व्ही. व्ही. कारजिन्नी  यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes