केआयटीच्या इंक्युबेशन सेंटरशी राज्य सरकारचा सामज्यंस करार
schedule11 Aug 24 person by visibility 565 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील नामांकित शैक्षणि संस्था असलेल्या केआयटीशी राज्य सरकारशी सामज्यंस करार झाला आहे. सीओईपी बरोबर केआयटीची निवड होणे हे केआयटीच्या दर्जात्मक कार्याचेच एक द्योतक आहे. राज्य सरकार व केआयटी मधील सामंजस्य कराराची प्रत महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विकास मंत्रालयाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ,कौशल्य विकास विभाग आयुक्त व ‘महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी’ च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निधी चौधरी व सचिव गणेश पाटील यांच्या उपस्थितीत केआयटीचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी व आय.आर.एफ.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर आरळी याच्याकडे सुपूर्द केली.
महाराष्ट्र सरकारच्या सहभागाने व पुढाकाराने राज्याच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी आणि समाजातील सर्व घटकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी स्टार्ट-अपना सक्षम करणे तसेच स्टार्ट-अप इकोसिस्टमच्या विकासाला चालना देण्यासाठी मजबूत पायाभूत सुविधा विकसित करणे या हेतूने‘महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी’ ची स्थापना झाली आहे.
केआयटीने गेल्या वर्षभरामध्ये जवळपास १० स्टार्टप्सना एकूण ५० लाखापर्यन्ताचा ‘इग्निशन फंड’ दिलेला आहे. तसेच १६ स्टार्टअप च्या कल्पना या कंपनीकडे नोंदणीकृत झालेल्या आहेत.केआयटीच्या वतीने ८ पेटंट फाईल झालेले असून जवळपास १५ हून अधिक विशेष कार्यशाळा या नवोद्योजकांसाठी व नवसंशोधकांसाठी केआयटीने आयोजित केलेल्या आहेत. याची दखल म्हणून या केआयटीला महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी (MSInS), महाराष्ट्र सरकारने इनक्यूबेटर सहकार्य निधी म्हणून ५ कोटी मंजूर केले आहेत.
सीओईपी पुणेचे भाऊ इन्स्टिट्यूट, सह्याद्री फार्म्स ,नाशिक, जितो इंक्युबेशन अँड इनोव्हेशन फाउंडेशन, मुंबई या दर्जेदार संस्थाप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील खाजगी (स्वायत्त) शैक्षणिक संस्थांमध्ये फक्त केआयटीची निवड केली आहे.
केआयटीचे अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले यांचे मार्गदर्शन या प्रक्रियेसाठी लाभले. या कामगिरीबद्दल पदाधिकाऱ्यांनी संचालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.