+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustअजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची यादी, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटलांचा समावेश adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश adjust कोल्हापुरात काँग्रेसचा सरप्राइज चेहरा कोण ? आज उत्तर मिळणार ! adjust शिवसेनेकडून आमदार प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरकेंना उमेदवारी adjustदक्षिणमध्ये पाटील, महाडिकांनी घेतले अर्ज ! उत्तरसाठी अर्ज घेणाऱ्यांत व्ही.बी, सत्यजित कदम यांची नावे !! adjustदूध उत्पादकांसाठी खुशखबर, गोकुळतर्फे नवीन ४००० बायोगॅस मंजूर ! चेअरमन अरुण डोंगळे adjustप्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांंना ३५ हजार रुपयांचा दंड, ३०० किलो प्लॅस्टिक जप्त adjustराहुल आवाडे गुरुवारी अर्ज भरणार adjust कोल्हापुरात बाइकस्वारांची धूम
1001157259
1001130166
1000995296
schedule11 Oct 24 person by visibility 101 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या आवारात २६ सप्टेंबर रोजी मद्यपान करुन सुरक्षा कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या त्या प्राध्यापकाला कॉलेज व्यवस्थापनने नोटीस काढली आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण कॉलेजमधील हा प्राध्यापक आहे. दरम्यान विद्यापीठाने, कॉलेजला प्रशासनाला पत्र पाठवून विद्यापीठ आवारात घडलेल्या घटनेविषयी कळविले आहे. २६ सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास प्राध्यापक व त्यांचा आणखी एक सहकारी दुचाकीवरुन विद्यापीठात जात होते. यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना अडविले. यावेळी कर्मचाऱ्यांसोबत वादावादी झाली. संबंधित प्राध्यापकाने मद्यपान केले होते तसेच त्यांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याची तक्रार विद्यापीठ प्रशासनाकडे झाली. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनुसार विद्यापीठ प्रशासनाने, कॉलेजला पत्र पाठविले आहे. या प्रकरणाची चौकशी व प्राध्यापकावरील कारवाईचा अहवाल विद्यापीठाला कळवावा असे म्हटले आहे. त्यानुसार कॉलेज प्रशासनाने, त्या प्राध्यापकाला नोटीस काढून म्हणणे मागविले आहे.