गोकुळच्या निवडणुकीसाठी नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील-चुयेकर, बाळासाहेब खाडेंचे अर्ज दाखल
schedule15 Sep 26 person by visibility 76 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला मंगळवारी 15 सप्टेंबर 3026 पासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी गोकुळचे माजी चेअरमन नविद मुश्रीफ, माजी संचालक शशिकांत पाटील चुयेकर व बाळासाहेब खाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. माजी चेअरमन नवीन मुश्री व बाळासाहेब काळे हे हे महायुतीचे उमेदवार तर शशिकांत पाटील चुयेकर हे काँग्रेस प्रणित समविचारी आघाडीचे उमेदवार असतील. गेली पाच वर्षे हे सगळे सत्ताधारी घटक म्हणूनच एकत्र होते यांना मात्र महायुती आणि महाविकास आघाडी अशी विभागणी दिसत आहे
माजी चेअरमन नविद मुश्रीफ व बाळासाहेब खाडे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि जनसुराजशक्ती पक्षाचे माजी संचालक ही उपस्थित होते यामध्ये माजी चेअरमन विश्वास पाटील, अरुण डोंगळे, माजी आमदार सुजित मिंणचेकर, अजित नरके, एस आर पाटील, रणजितसिंह पाटील, प्रा. किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, अमरसिंह, पाटील, करणसिंह गायकवाड, युवराज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पाटील बी एच पाटील, भोगावती कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील, पी आर पाटील , विकास पाटील कुरुकलीकर आदी उपस्थित होते. माजी संचालक शशिकांत पाटील हे काँग्रेसप्रणित समविचारी आघाडीचे उमेदवार आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांचे समर्थक आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना गोकुळचे माजी संचालक बाबासाहेब चौगुले, अभिजीत तायशेटे, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, अंजना रेडेकर, रामराजे कुपेकर आदी उपस्थित होते. रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय सभागृह येथे निवडणूक कार्यालय आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मोसमी चौगले काम पाहत आहेत. त्यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.