Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गांधीनगरमधील अनधिकृत बांधकामावरील कारवाईला स्थगिती देण्यास सर्किट बेंचचा नकारअजीम नवाज राही यांना रत्नाकर काव्य पुरस्कारकुलगुरू नियुक्तीला दिरंगाई, सिनेट सदस्यांचे राज्यपालाना पत्र ! लाठया खाऊ, जेलमध्ये जाऊ पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही ! नऊ जूनला कोल्हापुरात महामोर्चा !!डीवाय पाटील ज्युनिअर कॉलेजची महिमा शिर्के बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीयई-चलन संदर्भातील मागण्यांवर सरकार सकारात्मक, वाहतूकदारांना न्याय देण्यासाठी कार्यवाही - प्रताप सरनाईकउल्का महाजन, चिन्मयी सुमीत, प्रतिभा खैरनार, नितीन कोत्तापल्ले यांना दमसा सभेचे पुरस्कारहद्दवाढीवरुन महापालिका सभा तहकूब, गांधीनगरातील अतिक्रमण हटविण्यासाठी सभागृह आक्रमक चारचाकी वाहन सारले बाजूला…नगरसेवक सवार झाले इलेक्ट्रिक बाईक, सायकलवर !कृष्णराज महाडिक यांचा बार्शी - सोलापूर एसटी प्रवास

जाहिरात

 

कंत्राटी कामगारांच्या हक्कांसाठी विजयनगरममध्ये मोटारसायकल रॅली

schedule16 Jun 25 person by visibility 528 categoryउद्योग

 

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाची (संलग्न भारतीय मजदूर संघ) राष्ट्रीय कार्यकारिणीची दुसऱ्या दिवसाची बैठक आंध्रप्रदेशमधील विजयनगरम येथे पार पडली. सकाळी महेला फार्मास्युटिकल्स कंपनी परिसरात भारतीय मजदूर संघाचा झेंडा अनावरण करण्यात आला. त्यानंतर औद्योगिक वसाहतीतील कंत्राटी कामगारांनी शोषणाविरोधात आणि मूलभूत हक्कांसाठी एक भव्य मोटारसायकल रॅली काढली. "किमान वेतन २६ हजार द्या, ईइसआय मर्यादा ४२ हजारपर्यंत वाढवा, पीएफ लागू करा’अशा घोषणा देत परिसर दणाणून गेला. कंत्राटी कामगारांना स्थिर रोजगार मिळावा, भारतीय मजदूर संघासोबत त्वरित बैठक घेऊन निर्णय जाहीर करावा.जर सरकारने लवकरात लवकर सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, तर संपूर्ण देशात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा यावेळी महासंघाने दिला. मोर्चाचे नेतृत्व  –अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे अध्यक्ष कंदी श्रीनिवासन,  सचिन मेंगाळे, के. व्ही. राधाकृष्णन, डॉ. अ‍ॅलपी राजू, सत्यव्रत स्वाई ,सत्यनारायण ,मलय ,अनिकेत चक्रवर्ती कल्याण चौधरी आदींनी केले. मोर्चात शेकडो कामगार ऊत्स्फूर्तीने सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांसाठी ईएसआय कार्यालय समोर आंदोलन छेडण्यात येईल असे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes