केआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा
schedule25 Apr 24 person by visibility 434 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाच्या इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशनच्या वतीने कोहोर्ट १.० लॉन्चचे आयोजन करण्यात आले होते. एक दिवसीय कार्यशाळेमध्ये नवउद्योजक, उद्योग मार्गदर्शकांसाठी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. रेसिडेन्सी क्लबमध्ये कार्यक्रम झाला.
कार्यशाळेचे उद्घाटन डॉ.कार्थिक संकरण ,सीईओ, देशपांडे स्टार्टअप्स हुबळी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या मनोगतात स्टार्टअप चे महत्व,ते यशस्वी होण्यासाठी लागणारी यंत्रणा व तसेच त्या यंत्रणेच्या घटकातील समन्वय,सहकार्य अशा विषयाला घेऊन सहभागी लोकांशी संवाद साधला.
दिवसभरातील झालेल्या "स्टार्टअप स्ट्रॅटेजीज: नेव्हिगेटिंग चॅलेंजेस अँड अपॉर्च्युनिटीज" या विषयावरील पॅनल चर्चेमध्ये स्टार्टअप वाढीसाठी आवश्यक अशा पैलूंवरती चर्चा करण्यात आली. देशपांडे स्टार्टप्स हुबळीचे रक्षित कल्याणी यांच्यासह तुषार कामत, रणधीर पटवर्धन, यशांक गोकाणी , डॉ. अमित सरकार ,डॉ. सचिन शिंदे आणि यश राऊत यांनीही वैचारिक योगदान या सत्रात दिले.
केआयटी च्या इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशनचे कार्यकारी संचालक डॉ सुधीर आरळी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष सुनील कुलकर्णी उपाध्यक्ष साजिद हुदली सचिव दीपक चौगुले, वरिष्ठ विश्वस्त सचिन मेनन, संचालक डॉ.मोहन वनरोट्टी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये इंक्युबॅशन मॅनेजर देवेंद्र पाठक, इंक्युबेशन असोसिएटस पार्थ हजारे व अंजोरी कुंभोजे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.