सभागृह नेता, स्थायी समिती सभापतींचा कार्यालयीन प्रवेश
schedule05 Jun 26 person by visibility 13 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेचे स्थायी समिती सभापती विशाल शिराळे व सभागृह नेता मुरलीधर जाधव यांचा कार्यालयीन प्रवेश शुक्रवारी, पाच जून रोजी झाला. आमदार अमल महाडीक यांच्या हस्ते फित कापून कार्यालय प्रवेश केला. यावेळी आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड, सभागृहनेता मुरलीधर जाधव, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, गटनेते आदिल फरास, प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेवक जयंत पाटील, विजय जाधव, संजय मोहिते, नगरसेविका अर्चना कोराणे, राजनंदा महाडिक, निलांबरी साळोखे, माधुरी नकाते, माधुरी व्हटकर, नेहा तेंडूलकर, पूर्वा राणे, अनंत खासबागदार, उपस्थित होते.