+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustअजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची यादी, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटलांचा समावेश adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश adjust कोल्हापुरात काँग्रेसचा सरप्राइज चेहरा कोण ? आज उत्तर मिळणार ! adjust शिवसेनेकडून आमदार प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरकेंना उमेदवारी adjustदक्षिणमध्ये पाटील, महाडिकांनी घेतले अर्ज ! उत्तरसाठी अर्ज घेणाऱ्यांत व्ही.बी, सत्यजित कदम यांची नावे !! adjustदूध उत्पादकांसाठी खुशखबर, गोकुळतर्फे नवीन ४००० बायोगॅस मंजूर ! चेअरमन अरुण डोंगळे adjustप्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांंना ३५ हजार रुपयांचा दंड, ३०० किलो प्लॅस्टिक जप्त adjustराहुल आवाडे गुरुवारी अर्ज भरणार adjust कोल्हापुरात बाइकस्वारांची धूम
1001157259
1001130166
1000995296
schedule10 Oct 24 person by visibility 81 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या सप्तमीनिमित्त गुरुवारी,करवीर निवासिनी अंबाबाईची दुर्गादेवीच्या रुपात पूजा बांधली आहे.  वाघावर विराजमान दुर्गेच्या रूपात पूजा सजली आहे. 
वाघावर  स्वार झालेले दुर्गेचे हे अष्टभुजा रूप उत्तर भारतात विशेष प्रसिद्ध आहे. वरद कमळ तलवार चक्र शंख गदा धनुष्य आणि त्रिशूल धारण करणारी अशी ही जगदंबा दुर्गमासुराचा संहार करण्यासाठी प्रगट झाली अशी ख्याती आहे. करवीर निवासिनी अष्टभुजा रूपामध्ये सजली आहे.दुर्गा म्हणजे कठीणातल्या कठीण संकटाचेही निवारण करणारी देवता होय.  ही पूजाविद्याधर मुनिश्वर, अरुण मुनिश्वर, सोहम मुनिश्वर व सुकृत मुनिश्वर यानी बांधली. देवीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.