Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर फर्स्टतर्फे जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार ! कोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्र विकास परिषद भरविणार !!डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्सतंत्रज्ञान युगात जीआयएसचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक : कुलगुरू  डी. टी. शिर्केमार्केट सेस चालूच राहणार, कोल्हापूर बाजार समितीचे राष्ट्रीय बाजार समितीत वर्गीकरण नाही - मंत्री जयकुमार रावळ सार्वजनिक कार्यक्रमात अश्लिल - आक्षेपार्ह नृत्य सादरीकरणास प्रतिबंध करा - कलापथक निर्माता असोसिएशनराज्यस्तरीय तेली समाजाच्या व्यासपीठावर मंत्री बावनकुळे - विजय वडेट्टीवारांच्यामध्ये राजकीय जुगलबंदी ! पक्ष प्रवेशाची ऑफर, एक नंबर मंत्रीपदासाठी शुभेच्छा!!विद्यार्थी - पालकांनी जगण्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे :  आमदार सतेज पाटील आधी नोंदणी - मग स्थापना, तरीही संरक्षण ? गोकुळमधील अवसायन संस्थेसंबंधी उलटसुलट चर्चामंगेश चिवटेंना शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेत पाठवा : आमदार राजेश क्षीरसागर,  आमदार सुहास बाबर यांची  मागणीगोकुळच्या राजकारणात आमनेसामने उभे ठाकलेले एसटी बसेसच्या उद्घाटनला एकत्र

जाहिरात

 

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्स

schedule24 Aug 26 person by visibility 23 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कसबा बावडा येथील आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग (एआयएमएल) विभागातील विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विभागातील विद्यार्थ्यांना २९ हून अधिक नामांकित कंपन्यांकडून ६८ प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त झाल्या आहेत. मोव्हेट या कंपनीमध्ये सना मुजावर हिला ९ लाख रुपये वार्षिक सर्वोच्च पॅकेज मिळाले आहे. 

लॉन्च्ड ग्लोबल या कंपनीनमध्ये सर्वाधिक १२ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. एड्युव्हर्सिटी, बंगळुरूने १० विद्यार्थ्यांची, अनलॉक्स अकॅडमी ८ इन्फोसिसने ६, वॉलस्टार टेक्नॉलॉजीजने ४ तर फोक्सवॅगन प्रा. लि. ने ३ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. यामध्ये मोव्हेटमध्ये ९ लाख रुपये, एचपीमध्ये ८.५ लाख, ग्लोलॉजिक्स सोल्युशन्समध्ये ७.२ लाख रुपये, लॉन्च्ड ग्लोबलमध्ये ७ लाख रुपये, अनलॉक्स अकॅडमीमध्ये ६ लाख आणि झंवर ग्रुप मध्ये ५.५ लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळाले आहे. फॉक्स सोल्युशन्समध्ये ५.४६ लाख रुपये आणि मायक्रोलाइजमध्ये ४.८ लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळाले आहे.

विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार तांत्रिक प्रशिक्षण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंगशी संबंधित कौशल्यविकास, कोडिंग प्रॅक्टिस, कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल्स, मॉक इंटरव्ह्यू, ग्रुप डिस्कशन, करिअर काउन्सेलिंग तसेच प्लेसमेंटपूर्व विशेष प्रशिक्षण नियमितपणे दिले जात असल्याचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी सांगितले.

या यशासाठी अधिष्ठाता (सीडीसीआर) प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे, एआयएमएल विभागप्रमुख प्रा. डॉ. सिद्धेश्वर पाटील, प्लेसमेंट समन्वयक तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, सी.एच.आर.ओ. श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. संतोष चेडे आणि रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes