जिप कर्मचारी सोसायटीतर्फे सभासदांच्या गुणवंत मुलांचा सत्कार
schedule09 Nov 25 person by visibility 53 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन : कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्यावतीने सभासदांचे मुला-मुलींचा शैक्षणीक कला व क्रिडा उत्तेजनार्थ बक्षीस व सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला. साईकस एक्सटेन्शन येथील संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.
यावेळी संस्थेच्यावतीने इयत्ता १० वी व १२ वी सन २०२५ यावर्षी उत्कृष्ट गुण मिळविलेल्या तसेच इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परिक्षा, जवाहर नवोदय विद्यालय तसेच कला क्रिडा क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या सभासदांच्या मुला-मुलींना बक्षीस वितरण तसेच जिल्हा परिषदेच्या सेवेतून निवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सोसायटीचे चेअरमन श्रीकांत चव्हाण हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. प्रा युवराज पाटील यांचे व्याख्यान झाले. याप्रसंगी ११८ विद्यार्थी, ३६ सेवानिवृत्त सभासद व वर्ग १ ची पदोन्नती मिळालेल्या ९ सभासदांचा सत्कार झाला.
चेअरमन चव्हाण यांनी प्रास्ताविक करताना सोसायटीच्या मार्फत सभासद व सभासदांच्या मुलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली संस्थेचे मार्गदर्शक एम. आर. पाटील यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. व्हाईस चेअरमन रविंद्र जरळी यांनी आभार मानले.
पश्चिम महाराष्ट्रात एस.एम.एस. बँकिंग सुविधा देणारी तसेच सभासदांना RTGS/NEFT/IMPS सुविधा व मोबाईल अॅप सुविधा देणारी पहिली पगारदार पतसंस्था म्हणून संस्थेने नावलौकिक प्राप्त केला आहे. संस्थेचे दि.३०/०९/२०२५ अखेर भाग भांडवल १० कोटी ५८ लाख, ठेवी २२८ कोटी ५२ लाख, निधी २५ कोटी ३४ लाख, सभासद कर्जे २२४ कोटी १२ लाख, गुंतवणुक ४१ कोटी ६० लाख, नफा ३ कोटी २७ लाख, खेळते भांडवल २८० कोटी ९४ लाख आहे. सभासदांचे मुला-मुलींसाठी स्पर्धा परिक्षेसाठी अद्ययावत ग्रंथालय सुरू केले आहे. मुख्य कार्यालय इमारतीसाठी २० के.व्ही. चे सौर ऊर्जा निर्मीती पॅनल बसविणेत आले आहे. असे सांगितले. कार्यक्रमाला संचालक सुनील पाटील, रणजीत पाटील, सुधाकर कांबळे, सचिन गुरव, मुजमिल नावळेकर, अमर पाटील, मुख्य व्यवस्थापक व्ही एन बोरगे, आदी उपस्थित होते.