Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महाडिक उद्योग समूहाकडून दुष्काळग्रस्तांसाठी दहा लाखाची मदतजयंत आसगावकरांनी घेतली शरद पवारांची भेट अगोदर तुमच्यातील वाद मिटवा, मग आमच्याकडे बघा ! जिल्हा बँकेच्या सभेत मुश्रीफ व सतेज पाटलांचे राजकीय चिमटेदुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत गडहिंग्लज तालुक्याचा प्राधान्याने समावेश करावा - संग्रामसिंह कुपेकरजिल्हा बँकेत पुढे काय होणार आहे आता सांगू शकत नाही... सभेत हसन मुश्रीफांचे सूतोवाचज्ञानेश कुमार, भाजपच्या विरोधात काँग्रेसची कोल्हापुरात जोरदार निदर्शनेन्यायालये ही सर्वसामान्यांचा आशावाद, वकिलांनी व्यावसायिक नीतीमूल्ये सांभाळावीत - असीम सरोदेमहायुतीत संशयकल्लोळ, ठरावधारकांचे व्हेरिफिकेशन ! मंत्र्यांच्यासमोर हायहोल्टेज ड्रामा अन् डॅमेज कंट्रोलसाठी नेत्यांची धाव !!शिक्षक बँकेची सभा गोंधळाची, सत्ताधारी- विरोधकात हमरीतुमरी ! संचालकांची संख्या १७ वरुन २१ करण्याचा ठराव मंजूर !!गडहिंग्लजमध्ये मुख्याध्यापक संघाची नव्याने इमारत उभारणार, मुख्याध्यापक संघाच्या सर्वसाधारण सभेत निर्णय

जाहिरात

 

मिनी मंत्रालय ते मंत्रालय, जिल्हा परिषद सदस्य बनले आमदार ! राहुल आवाडे, अशोकराव माने विजयी !

schedule23 Nov 24 person by visibility 754 categoryमहानगरपालिका जिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्ह्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहातील दोन सदस्य मैदानात उतरले होते. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राहुल आवाडे हे विजयी झाले. हातकणंगले मतदारसंघातून जनसुराज्य शक्ती पक्षाचे अशोकराव माने यांनी निवडणूक जिकंली. मिनी मंत्रालय ते मंत्रालय असा त्यांचा प्रवास घडला.

हातकणंगलेतून दलितमित्र अशोकराव माने यांना १,३३, ६२७ इतकी मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार व काँग्रेसचे विद्यमान आमदार राजू आवळे यांना ८७,२९९ मते तर तिसऱ्या आघाडीचे उमेदवार व माजी आमदार सुजित मिणचेकर यांना २४,७६७ मते मिळाली. माने हे ४६,३२८ मतांनी विजयी झाले. या मतदारसंघात या तीन उमेदवारासह अपक्ष उमेदवार म्हणून वैभव कांबळे रिंगणात आहेत. येथे मतमोजणीच्या २४ झाल्या. माने यांनी प्रारंभापासून आघाडी घेतली. हातकणंगलेसाठी यंदा ७६.४५ टक्के मतदान झाले. एकूण २,६१, २१५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.येथे सोळा उमेदवार आहेत. 

इचलकरंजीत महायुतीकडून राहुल आवाडे व महाविकास आघाडीकडून मदन कारंडे यांच्यामध्ये प्रमुख लढत होती. या मतदारसंघात ६९.६८ टक्के मतदान झाले होते. २,१७,८५३ मतदारांनी मतदान केले आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीच्या नेतेमंडळींनी सभा घेतल्या होत्या. इचलकरंजी मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण वीस फेऱ्या होणार आहेत. महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर राहिले. प्रत्येक फेरीनिहाय त्यांच्या मतदानात वाढ होत गेली. या मतदारसंघात या निवडणुकीत राहुल आवाडे यांना एक लाख ३१ हजार ९१९ मते मिळाली. कारंडे यांना ७५ हजार १०८ मते तर विठ्ठल चोपडे यांना २४६१ मते मिळाली. आवाडे हे ५६,८११ मताधिक्क्यांनी विजयी झाले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes