Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विवेकानंद कॉलेजमध्ये विवेक वार्षिक अंकाचे प्रकाशनखासगी क्लासेस-लॉजिंगसह दुकानांची तपासणी होणार, आयुक्तांचे सहाय्यक आयुक्तांना आदेशसेवा ज्येष्ठ शिक्षकांवरील अन्यायविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, सीईओंना निवेदनगोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांचे शक्तीप्रदर्शन, ३२४ ठराव दाखलगोकुळच्या निवडणुकीत संचालकपदाच्या चार जागा, एक वर्ष चेअरमनपद हवे- आमदार शिवाजीराव पाटील भाजपचे 1431 ठराव ! गोकुळच्या संचालक मंडळात भाजपच मोठा भाऊ !! खासदार धनंजय महाडिकगोकुळमध्ये अरुण नरके गट भाजपसोबत,  महाडिकांशी दोस्ताना कायमशहीद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरामहात्मा फुले विद्यालयात हॅप्पी डिजिटल क्लासरुम, मॉडेल स्कूलसाठी प्रयत्नशीलकौन्सिल ऑफ एज्युकेशनतर्फे निमशिरगावमध्ये शंभरहून अधिक वृक्षांची लागवड

जाहिरात

 

गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांचे शक्तीप्रदर्शन, ३२४ ठराव दाखल

schedule29 Jun 26 person by visibility 16 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोकुळचे माजी चेअरमन, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत तब्बल ३२४ ठराव दाखल केले. करवीर, शिरोळ, राधानगरी, पन्हाळा, हातकणंगले, चंदगड आणि गगनबावडा तालुक्यांतील दूध उत्पादक संस्थांनी मोठ्या संख्येने आपल्या प्रतिनिधीच्या नावाचा ठराव पाटील यांच्याकडे सुपूर्त करत त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला. गोकुळ निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेतर्फे, ठरावधारकांचा मेळावा आयोजित केला होता.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर,  आमदार चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीमध्ये कळंबा येथील अमृतसिद्धी कार्यालय येथे मेळावा झाला. यानंतर  ताराबाई पार्क परिसरातील सभागृहात विविध भागांतून आलेल्या दूध उत्पादक संस्था प्रतिनिधी, सभासद आणि कार्यकर्त्यांनी विश्वास पाटील यांची भेट घेऊन आपल्या संस्थांचे ठराव त्यांच्याकडे सुपूर्द केले.मेळाव्याच्या ठिकाणी "आबाजी हाय तर चिंता नाय...!" या घोषवाक्यासह फलक आणि "आबाजी समर्थक" अशा टोप्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. “आबाजी हाय तर चिंता नाय... हा फलक अधिक लक्षवेधी ठरला.  पालकमंत्री  आबिटकर यांनीही विश्वास पाटील यांच्याकडे जमा झालेल्या ३२४ ठरावांच्या संख्येची दखल घेत, सामान्य दूध उत्पादकांसाठी केलेल्या कामाची हीच खरी पोहोचपावती असल्याचे सांगितले. तसेच करवीर मतदारसंघात आमदार चंद्रदीप नरके यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी केलेल्या कार्याचाही गौरवपूर्ण उल्लेख केला.

विश्वास पाटील म्हणाले, गेली चार दशके गोकुळ हीच माझी कर्मभूमी राहिली आहे. गोकुळचे शिल्पकार माजी चेअरमन स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर, एस.आर. पाटील, अनेक ज्येष्ठ सहकार नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली. नऊ वर्षे चेअरमन म्हणून काम करताना दूध उत्पादकांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. २००४ मध्ये सुरू केलेली वासरू संगोपन योजना आजही यशस्वीपणे सुरू असून तिचा लाभ हजारो दूध उत्पादकांना होत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या गोठ्यात दर्जेदार जातिवंत जनावरे तयार होत आहेत, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes