न्यू वूमेन्स कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये नेत्ररोग तपासणी शिबिर
schedule14 Aug 25 person by visibility 175 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचालित,न्यू वुमेन्स कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेजमध्ये जागतिक अवयवदान दिनाचे औचित्य साधून नंदादीप नेत्रालय व न्यू वुमन्स फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्ररोग तपासणी शिबिर झाले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन व दीपप्रज्वलनाने झाली. कॉलेजचे प्राचार्य रवींद्र कुंभार यांनी शिबीर घेण्यामागचा उद्देश व डोळ्याची काळजी घेणे गरजेचे का आहे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी नंदादीप नेत्रालयाच्या डॉ.सुपर्णा भिवसे यांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, तपासणी व योग्य आहार याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे चेअरमन डॉ. के.जी. पाटील यांनी उपक्रमाबद्दल अभिनंदन केले. संस्थेचे व्हाइस चेअरमन डी. जी. किल्लेदार,संचालक पी. सी.पाटील नंदादीप नेत्रालयाचे योगेश पाटील उपस्थित होते.सदर शिबिराचा115 हून अधिक जणांनी लाभ घेतला. पूजाश्री पाटील यांनी सूत्रसंचालन केले.