Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
स्वरुप कदम ठरतोय मतदारांच्या पसंतीचा चेहरावांगी बोळ परिसरात उमा बनछोडेंच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसादजीवाची पर्वा न करता कोरोना कालावधीत नागरिकांना मदत, महापुरातही दिला नागरिकांना आधारजनसुराज्यच्या उमेदवारांच्यासाठी विनय कोरे ऑन फिल्ड, विविध प्रभागात फिल्डींग सोयीच्या बदलीसाठीची बोगसगिरी महागात, तेरा शिक्षक निलंबित !विवेकानंद कॉलेजमध्ये  राष्ट्रीय चर्चासत्र,  महाराष्ट्र हिंदी परिषदेच्या अधिवेशनाचे आयोजनरामानंदनगर-जरगनगरात महायुतीच्या उमेदवारांचा प्रचाराचा धडाकासतेज पाटलांनी केला केएमटीने प्रवास, प्रवाशांशी साधला संवादतंत्रज्ञानातील सक्षमतेमुळे विकसित भारतचे स्वप्न लवकरच सत्यात - प्रा. टी जी सीताराम सदर बाजार - विचारेमाळ परिसरात महायुतीच्या प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

जाहिरात

 

माजी पालकमंत्र्यांनी टोल विरोधी आंदोलनाचे नाटक करू नये- सत्यजित कदम

schedule01 Aug 24 person by visibility 555 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था आणि टोल आकारणी याविरोधात काँग्रेस पक्षातर्फे शनिवारी, एक ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनावरुन भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी टीकास्त्र आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्यजित कदम यांनी या विषयावरुन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.  माजी पालकमंत्र्यांनी टोलविरोधी आंदोलनाचे नाटक करू नये असा टोला कदम यांनी लगाविला आहे.
कदम यांनी पत्रकांत म्हटले आहे, ‘कोल्हापूर शहरांतर्गत टोल लावून व टोल वसूल करणारे माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील हे महाराष्ट्रात मात्र नेतृत्व दाखवत राष्ट्रीय महामार्गावरील लावलेले टोल मुक्त करा अशा स्वरूपाचा कांगावा करणाऱ्या आंदोलनाचे तीन ऑगस्ट पासून नेतृत्व करणार आहेत. कोल्हापुरात थेट पाईपलाईन योजनेचा देखील त्यांनी कशा पद्धतीने श्रेयवादातून बोजवारा वाजवला आहे याचा नुकताच अनुभव कोल्हापुरातील जनतेने काही दिवसांपूर्वीच पूरस्थितीमुळे अनुभवला आहे.
       कोल्हापुरात १२५ कोटींच्या रस्त्याचा खर्च ४५० कोटी पर्यंत नेऊन त्याची वसुली कोल्हापुरातील सर्वसामान्य नागरिकांच्या माथी मारण्याचे पाप पालकमंत्री असताना पाटील यांनी केले होते. पण भाजप व शिवसेना सरकारने ते पैसे भरले हे कोल्हापुरातील जनता विसरली नाही. तसेच थेट पाईपलाईन योजनेत देखील कशाप्रकारे भ्रष्टाचार केला आहे व प्रकल्पाची रक्कम दुपटीने वाढवली आहे हे सर्व जनतेला माहित आहेच.
 आमदार, खासदार, मंत्री यांना टोलची माफी असताना व संपूर्ण कोल्हापूरचा विरोध असताना देखील स्वतः टोलची पावती फाडून कोल्हापूरकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे पाप या तत्कालीन पालकमंत्र्यांनी केले होते. गेली १५ वर्षे कोल्हापूर महानगरपालिकेत सत्ता व गेली ५ वर्षे कोल्हापूर शहरात दोन्ही आमदार असूनदेखील कोल्हापुरकरांना शहरातील रस्त्यावरून फिरताना चंद्रावर फिरण्यासारखा अनुभव सतेज पाटील देत आहेत आणि या प्रश्नावर बोलायचे सोडून ते राष्ट्रीय व राज्याच्या प्रश्नावर आंदोलन करत आहेत. 
 ज्या रस्त्यांची कामे सुरू आहेत, अथवा ज्या रस्त्यांची कामे झालेली नाही अशा रस्त्यांवरील टोल माफ करण्याचे केंद्र सरकारकडून धोरण निश्चित केले जात आहे. काही दिवसातच त्याची अंमलबजावणी होणार असून त्यामध्ये पुणे कोल्हापूर रस्ता देखील धरणार असल्याची खात्रीलायक माहिती असले कारणानेच केवळ श्रेय मिळवण्याच्या हेतूने काँग्रेस पक्ष व सतेज पाटील हे टोलमुक्त आंदोलनाच्या नावाखाली आंदोलन करून, केंद्रशासनच मुभा देणार असणाऱ्या योजनेचे श्रेय घेऊन जनतेची धूळफेक करत आहेत. तरी असल्या खालच्या थराचे व श्रेय वादाचे राजकारण हे त्यांचे त्यांनाच लखलाभ व जनता असल्या फसवेगिरीला भुलणार नाही याची माजी पालकमंत्र्यांनी नोंद घ्यावी.’असे कदम यांनी म्हटले आहे. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes