+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustअजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची यादी, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटलांचा समावेश adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश adjust कोल्हापुरात काँग्रेसचा सरप्राइज चेहरा कोण ? आज उत्तर मिळणार ! adjust शिवसेनेकडून आमदार प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरकेंना उमेदवारी adjustदक्षिणमध्ये पाटील, महाडिकांनी घेतले अर्ज ! उत्तरसाठी अर्ज घेणाऱ्यांत व्ही.बी, सत्यजित कदम यांची नावे !! adjustदूध उत्पादकांसाठी खुशखबर, गोकुळतर्फे नवीन ४००० बायोगॅस मंजूर ! चेअरमन अरुण डोंगळे adjustप्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांंना ३५ हजार रुपयांचा दंड, ३०० किलो प्लॅस्टिक जप्त adjustराहुल आवाडे गुरुवारी अर्ज भरणार adjust कोल्हापुरात बाइकस्वारांची धूम
1001157259
1001130166
1000995296
schedule12 Oct 24 person by visibility 179 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर येथील केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाच्या अत्यंत महत्वाच्या पाच वर्षाचा कार्यकाळ असणाऱ्या नूतन ‘महाविद्यालय विकास समिती’ची (सीडीसी - कॉलेज डेव्हलपमेंट कमिटी) बैठक नुकतीच  झाली. नूतन सदस्य म्हणून उद्योजक मोहन घाटगे, चंद्रशेखर डोल्ली,शिक्षण तज्ञ म्हणून विश्वेश्वरय्या टेक्निकल युनिव्हर्सिटी,बेळगावी चे रजिस्ट्रार डॉ.रंगास्वामी यांची तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून डॉ. डी.जी.साठे, डॉ. समीर नागटिळक ,प्रा.शितल वरूर ,डॉ.सई ठाकूर ,प्रा अमोल सावंत तर शिक्षकेतर प्रतिनिधी म्हणून विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली.
या बैठकीस मागील कार्यकाळातील सदस्य  व्ही. एम. देशपांडे, डॉ बी.एम.हिर्डेकर, शिक्षक प्रतिनिधी डॉ. वाय. एम. पाटील, प्रा संजय लिपारे, डॉ. दिपाली जाधव ,शिक्षकेतर प्रतिनिधी  विजय पाटोळे उपस्थित होते.  केआयटीच्या ४१ वर्षांच्या दर्जेदार शिक्षणाच्या प्रवासात  मान्यवरांचे मार्गदर्शन लाभलेले आहे असेच मार्गदर्शन,सहकार्य आगामी काळातही सर्व नवीन सदस्यांकडून मिळेल अशी अपेक्षा संस्थेचे अध्यक्ष  साजिद हुदली यांनी व्यक्त केली.  संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी प्रास्ताविक केले. बैठकीसाठी संस्थेचे उपाध्यक्ष  सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले उपस्थित होते.